मी साईभक्त - मोदी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

शिर्डी - ""आमच्या गावात माझे मोठे बंधू सोमाभाई यांनी घराशेजारीच साईबाबांचे मंदिर बांधले आहे. मी आणि माझे कुटुंब साईभक्त आहोत. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना मी साईदर्शनासाठी शिर्डीत आलो होतो. साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश मी भाषणातून देशभर पोचविण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण जगाला या संदेशाची गरज आहे,'' अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केल्या. 

साईसमाधी शताब्दीनिमित्त येथे 16 ते 23 ऑगस्ट यादरम्यान सद्‌गुरू गंगागीर महाराज हरिनाम सप्ताह होणार आहे. त्याचे निमंत्रण देण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे, सप्ताहाचे संयोजक व सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज आणि संयोजन समिती पदाधिकाऱ्यांनी आज संसद भवनात पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्या वेळी मोदी यांनी भावना व्यक्त केल्या. या सप्ताहाला हजेरी लावण्यास मला आनंद होईल, मी निमंत्रण स्वीकारत आहे, असे ते म्हणाले. 

मराठीत संवाद 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याशी मराठीत संवाद साधला. महंत रामगिरी महाराज यांचे पंतप्रधानांनी खुर्चीवरून उठून स्वागत केले.

Web Title: i am Saibhakta - Modi