खंडेरायाची शपथ मी शिवी दिली नाही- जानकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

मुंबईः दुग्धविकास राज्यमंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी आज (गुरूवार) भगवानगडावरील आपल्या भाषणाबद्दल खेद व्यक्त केला.

जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना विखारी भाषा वापरली होती. बारामतीचे वाटोळं करीन, अशी धमकीच जानकर यांनी भगवानगडावरील भाषणात दिली होती. त्यावरून राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला. रासपच्या कार्यालयांवर काही ठिकाणी दगडफेकही झाली. 

गुरूवारी माध्यमांसमोर बोलताना जानकर यांनी खेद व्यक्त केलाच, मात्र आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याची सारवासारव केली. 

जानकर यांनी प्रसिद्धीस दिलेले निवेदन असेः खंडेरायाची शपथ, मी गरीबांचा प्रतिनिधी आहे बलाढ्यांशी लढा देतो पण संस्कृतीने गरीब नाही. मी कोणाला शिवी दिली नाही किंवा देत नाही. भ्रष्ट मार्गाने पैसे कमावणारे व त्यावर राज्य करणाऱ्यांना जो ग्रामीण रूढ शब्द आहे, तो वापरला. वाटल्यास सर्व शब्दकोशात तपासावा. गेल्या अनेक वर्षांच्या भ्रष्टाचाराचे मूळ कोठे आहे हे जगाला माहित आहे. या आशयाचे मी काय अनेक लोक अनेकदा भाषणात बोलले. आताच भगवान गडावरील भाषणाचे एवढे भांडवल झाले हे विशेष वाटते. सिंचन घोटाळा महाराष्ट्रातील लोकांच्या दुःखाचे मूळ आहे. यात कोण आहे हे सर्वज्ञात आहे. राजकारणात खिशात दमडी नसताना मी बलाढ्य शक्तींना पुरून उरलो. ते माझ्या ग्रामीण लोकांच्या वावरातून व भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्यातून शक्य झाले. मी कोणाला वैयक्तिक दुःखावण्यासाठी हे बोललो नाही. विपर्यास झाला हे मात्र वाईट. अर्थ चुकीचा लावल्याने महाराष्ट्रातील लोकांचे मन कलुशीत झाले असेल तर याबद्दल खेद व्यक्त करतो.

पश्चिम महाराष्ट्र

म्हसवड : माण तालुक्यातील विरळी नजीकच्या कापूसवाडी येथील म्हारकी शिवारातील शेतातील उघड्या बोअरवेलमध्ये मंगेश अनिल...

06.27 PM

कर्जमाफीवर प्रतििक्रया - २५ हजार रुपये रक्कम तुटपुंजी असल्याचा दावा कोल्हापूर - संस्था पातळीवर आपले खाते थकीत राहू नये,...

10.36 AM

कोल्हापूर - माझ्या आठवड्यात शुक्रवारी श्री करवीरनिवासिनी अंबाबाईच्या बांधल्या गेलेल्या अलंकार पूजेवरून विवाद उत्पन्न झाला....

10.36 AM