पतीच्या मित्राकडूनच धमकी देऊन बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

इचलकरंजी - पतीच्या मित्रानेच धमकी देऊन बलात्कार केल्याची फिर्याद विवाहितेने आज येथील पोलिसांत दिली. शिवाय बलात्कार केल्याची माहिती पतीला सांगण्याची धमकी देऊन पीडित विवाहितेकडून 15 हजार रुपये खंडणीही संशयिताने उकळल्याचे विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे. प्रमोद बजरंग सासणे असे संशयिताचे नाव आहे. 

पीडित विवाहिता यंत्रमाग कारखान्यामध्ये वहीफणी कामगार आहे. संशयित आरोपी प्रमोद सासणे आणि विवाहितेचा पती एकमेकांचे मित्र आहेत. मित्र घरी नसल्याचे पाहून त्याने आज त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. बलात्काराबाबत पतीला सांगतो, अशी धमकी देऊन पीडित विवाहितेकडून पंधरा हजार रुपयांची खंडणीची मागणी केली. अब्रूच्या भीतीने महिलेने दागिने गहाण ठेवून संशयित प्रमोदला 15 हजार रुपये दिले. 

दरम्यान खंडणी घेऊनही आरोपी प्रमोदने पीडित महिलेच्या पतीला झाला प्रकार सांगितला. त्यावरून या दाम्पत्यात भांडण झाले. नंतर पीडित महिलेला लहान मुलीसह पतीने घराबाहेर हाकलून दिले. हा गंभीर प्रकार कबनूर येथील एका सामाजिक महिला कार्यकर्तीला समजला. तिने या प्रकरणी आवाज उठविण्यासाठी मैत्रिणीच्या मदतीने विवाहितेसह शिवाजीनगर पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत गुन्हा दाखल करून घेत आरोपी प्रमोद सासणे याच्या मुसक्‍या आवळल्या. या प्रकरणाचा तपास जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक रमेश सरवदे करीत आहेत.