2018 च्या त्रुटी वगळून 2019साठी कऱ्हाड सज्ज 

karhad
karhad

कऱ्हाड : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शहरातील सर्वच घटकांनी केलेल्या कामामुळेच पालिका यशस्वी झाली आहे. यंदाच्या काही त्रुटींमुळे कऱ्हाड पालिका स्वच्छ सर्वेक्षणात राहिली असली तरी त्या त्रुटींमध्ये विशेष सुधारणा करून येणाऱ्या 2019 च्या स्पर्धेसाठी आम्ही सज्ज आहोत, असा विश्वास नगराध्यक्षा रोहणी शिंदे यांनी व्यक्त केला. 

येथील पालिकेचा स्वच्छ सर्व्हेक्शनात देशात 39 तर राज्यात 23 क्रमांक आला. त्यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपाध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, गटनेते राजेंद्र यादव, आरोग्य सभापती सौ. प्रियांका यादव, माजी सभापती विजय वाटेगावकर व अन्य समित्यांचे सभापती, नगरसेवक यावेळी उपस्थीत होते. क्रमांक आळ्याबद्दल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. 

शिंदे म्हणाल्या, स्‍पर्धेसाठी लोकसहभाग महत्वाचा ठरला. प्रत्‍येक पेठेतील, वार्डातील शैक्षणिक, बँकींग, सामाजिक, आर्थिक व वैदयकिय क्षेत्रातील लोकांनी तळमळीने काम केले. सर्वांनी नगरपरिषदेला मोलाची साथ दिली. याचा सार्थ आभिमान नगराध्‍यक्षा म्‍हणून मला आहे. यापुढेही असेच काम होईल.मुख्याधिकारी श्री. डांगे यांनी स्पर्धेची माहिती दिली. ते म्हणाले, केंद्र शासनाच्‍या स्‍वच्‍छ भारत अभियानांतर्गत स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2018 स्‍पर्धेमध्‍ये एक लाखापेक्षा कमी लोकसंख्‍येच्या शहरांच्‍या वर्गवारीमध्‍ये भारतातील सुमारे 3400 शहरे होती. त्यात आपल्या शहराचा 39 क्रमांक आला आहे. केंद्र सरकारकडून 5 कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. हा शहराचा बहुमान आहे. स्वच्चतेसाठी 22 लाख खर्च केले होते. त्याबदल्यात मिळालेला बक्षीस मोठे आहे.

त्याशिवाय गावातील सर्वच गटातटांनी एकत्रीत येवून काम केल्याने यश मिळू शकले. उपनगराध्‍यक्ष पाटील यांनी शहरात सुरक्षीततेसाठी स्वतंत्र 125 कॅमेरे लावणार आहे. त्याशिवाय शहरातून मागणी वाढल्यास काही कॅमेरेही बसवण्याचे नियोजन आहे. राजेंद्र यादव यांनी शहरातील वाहतूकीच्या समस्येवर लवकरात लवकर मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पोलिसांसी समन्वय साधून मार्ग काढून आरोग्य विभागाचे माजी सभापती वाटेगावकर म्हणाले, शहर कचरा कोंडाळे मुक्त केले. तसे काम कोणत्याच शहरात झालेले नाही. त्यामुळे क्रमांकात आपल्याला अव्वल स्थान मिळू शकले. ज्येष्ठ नगरसेवक पावसकर म्हणाले, यापूर्वी कऱ्हाडने स्वच्छता अभियानात क्रमांक पटकवला आहे. यावेळी आम्ही क्रमांक पटकवला आङे. पुडील वर्षाच्या स्पर्धेसाठी आम्ही तयारी करत आहोत. त्यात नक्कीच पहिल्या दहामध्ये कऱ्हाड असेल. यावेळी सभापती सौ. यादव यांनीही मनोगत व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com