मोहोळ तालुक्याच्या विकासाशी निगडीत महत्वाची पदे रिक्त

राजकुमार शहा 
मंगळवार, 29 मे 2018

मोहोळ : मोहोळ तालुक्याला गेल्या सुमारे पाच वर्षापासुन प्रभारीचा शाप असुन अनेक विभागातील महत्वाची पदे रिक्त आहेत. सध्या कार्यरत असलेल्या प्रभारी कारभाऱ्यांना महत्वाचे निर्णय घेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे तालुक्याच्या विकासाशी निगडीत असणारी तहसीलदार, पोलिस निरीक्षक व उपअधिक्षक, भुमीअभिलेख ही पदे रिक्त आहेत. यामुळे तालुका विकासाच्या दृष्टीकोनातुन बॅकफुटवर गेला आहे हे आधिकारी नसल्याने मोठी गुंतागुंत वाढत आहे.

मोहोळ तालुका तसा हेवीवेट तालुका आष्टी जलाशय, उजनी डावा कालवा, भिमा सिना नदीमुळे बागायती क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. दररोज लाखोचे व्यवहार व उलाढाल  होत आहे. तालुक्याच्या जडणघडणीत महत्वाची भुमिका बजावणार तहसीलदार हे पद रिक्त आहे. सध्या कार्यरत असणारे प्रभारी तहसीलदार किशोर बडवे यांना तालुक्याची चांगली माहिती आहे. मात्र महत्वाचे निर्णय घेताना त्यांनाही तारेवरची कसरत करावी लागते. शेतकऱ्यांच्या प्रगतीशी निगडीत असे तालुका कृषी अधिकारी हे पद रिक्त आहे शेततळी ठिबक सिंचन वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे शेतकरी योजनापासुन वंचित राहतात.

शेतकऱ्यांच्या बांधाच्या  व अन्य तक्रारीला चाप लावणारे उपअधीक्षक भुमी अभिलेख़ या कार्यालयातील कार्यालय प्रमुखासह तब्बल अकरा पदे रिक्त आहेत तर त्यात कहर म्हणजे भुकर मापक हे पद रिक्त असल्याने सुमारे तीनशे मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत त्यामुळे गुंतागुंत व तक्रारी वाढत आहेत. पंचायत समितीच्या अधिपत्याखाली कार्यरत असणारे बाल विकास प्रकल्प अधिकारी, लघुपाटबंधारे विभागातील उप अभियंता ही पदे रिक्त असल्याने कुपोषण तसेच जलयुक्त शिवार व अन्य कामावर दुर्लक्ष होत आहे.तालुक्याच्या दृष्टीने हे घातक आहे तालुक्यात अनेक पक्षांचे राजकीय नेते आहेत त्यांनी पाठपुरावा केला तर रिक्त पदे भरणे अवघड नाही मात्र या सर्वाना राजकीय अनास्थाही तेवढीच कारणीभुत आहे.

Web Title: Important posts related to the development of mohol taluka is empty