आईच्या चेहर्‍यावर हसू, वडिलांच्या चेहर्‍यावर समाधान तेच घर सुखी : इंदुरीकर महाराज

आईच्या चेहर्‍यावर हसू, वडिलांच्या चेहर्‍यावर समाधान तेच घर सुखी : इंदुरीकर महाराज

बार्शी : ज्याच्या घरातील आईच्या चेहऱ्यावर हसू आणि वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान ते घर सुखी असते. ज्याठिकाणी भोग आहे तिथे रोग आहे.. त्यामुळे व्यसने करू नका असा सल्ला तरुणांना दिला.. पैशाने मिळते ते सुख आणि आंतरिक शुद्धी ने मिळते ते समाधान असते. पुस्तकी ज्ञानाने सुखी व्हाल आणि आध्यात्मिक ज्ञानाने समाधान मिळते.. असे सांगत वासना मनात  ठेवत जाऊ नका शुद्ध विचार महत्त्वाचे आहेत, असे विचार हभप निवृत्ती महाराज देशमुख यांनी सांगितले

बार्शी येथील भगवंत मैदानावर बार्शी नगरपालिका व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भगवंत महोत्सव समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या असलेल्या भगवंत महोत्सवाच्या चौथ्या दिवशी  संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर ते बोलत होते.  व्यसने करू नका, जास्त पैसा पैसा करू नका, परिश्रम करा, वेळ वाया घालवू नका, काहीतरी काम करा, उद्योगी राहा अशा सल्ला त्यांनी युवकांना दिला.

साठविला हरी जे ह्रदय मंदिरी या संत तुकाराम महाराज यांच्या चार चरणाच्या अभंगावर निवृत्ती देशमुख महाराज यांनी उपस्थितांना पोट धरून हसवले. सृष्टीचा निर्माता हा देव असून सांभाळ करणारा आणि संपवणारा ही तोच आहे. ईश्वर हा जगाचा मालक आपण मात्र निमित्त मात्र आहे. सर्व सुखे पायाखाली घेण्याची ताकद माणसात आहे. जास्त देवदेवही करू नका आणि बोंबलतही जाऊ नका. सध्याच्या जगात मूर्खांना किंमत आणि सज्जनांना त्रास सुरू आहे. 

बार्शी नगरी पवित्र नगरी असून साक्षात विष्णू व महालक्ष्मीचे अधिष्ठान आहे. १२ महिन्याच्या बारा एकादशी पूर्ण झाल्यानंतर जी बारस येते ती बार्शीत सोडल्यानंतरच उपवास पूर्ण होतो. बार्शीत बारा ज्योतिर्लिंग आहे. १२ मठ आहेत. धार्मिक अध्यात्मिक स्वरूपाने नटलेली नगरी आहे. वैभवपूर्ण कार्यक्रम करून धर्म संस्कृतीची शिकवण देण्याचे काम या महोत्सवाने केले असल्याचे प्रभुदेव शिवाचार्य माढेकर महाराज यांनी सांगितले.

शासनाच्या योजनेतून नगरपालिकेच्या माध्यमातून भगवंत मैदानावर सुमारे ८ कोटी रुपये खर्चाचे सुसज्ज स्टेडियमच्या विकासकामाचे भूमिपूजन भगवंत प्रकटदिनाचे औचित्य साधून दि २७ रोजी करण्यात येणार असल्याचे यावेळी माजी आ राजेंद्र राऊत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, मुख्यधिकारी शिवाजी गवळी, प्रभुदेव शिवाचार्य माढेकर महाराज, जयवंत बोधले महाराज, भास्कर मांजरे महाराज, परशुराम डोंबे, उस्मान अली शाह, शंकर महाराज जगताप, अंबऋषी पाटील, सतीश आरगडे, फपाळ, आप्पासाहेब पवार, प्रभाकर बारबोले, अनिल डिसले, आबा लांडगे महाराज, गोकुळ महाराज फपाळ, अण्णा महाराज धुमाळ, जनार्धन अप्पा डमरे महाराज, घोरपडे महाराज आदी बार्शी तालुक्यातील आध्यत्मिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com