सांगोल्यात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा ; मोबाईल, कारसह 39 लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

सट्टयापोटी एजंटने घरी ठेवलेले रोख 41 हजार 370 रुपये असा एकूण 12 लाख 30 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल व एजंटकडील मोबाईल व रोख रक्कम असा 25 हजार पाचशे रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सोलापूर : आयपीएलमधील दिल्ली डेअरविल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सुरु असलेल्या मॅचवर सट्टा खेळणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सांगोल्यात दोन ठिकाणी छापे टाकून कारवाई केली.

सांगोल्यात कडलास रोडवरील अलराईनगरातील अनिल चव्हाण याच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर आणि एकतपूर रोडवरील ड्रिमसिटी अपार्टमेंटमध्ये आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा खेळला जात होता. पोलिसांनी रोख रकमेसह टीव्ही, एलएडी, मोबाईल, कार असा 39 लाख आठ हजार साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

आयपीएल मॅचवर सट्टा लावला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांना कारवाईचे आदेश दिले होते. पोलिसांच्या पथकाने सोमवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास एकाच वेळी दोन ठिकाणी छापे टाकले. एखतपूर रोड सांगोला येथील ड्रिमसीटी अपार्टमेंटमध्ये छापा टाकला. आयपीएलच्या पंजाब विरुद्ध दिल्ली या मॅचवर सट्टाजुगार घेणाऱ्याकडून 25 हजार 340 रुपये रोख रक्कम व काळ्या रंगाचा एलईडी टीव्ही, सेटटॉप बॉक्‍स, रिमोट,इन्व्हर्टर, बॅटरी, तीन मोबाईल व टोयाटो इनोव्हा गाडी नं. एमएच 45 टी 0004 असा 11 लाख 89 हजार 440 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सट्टयापोटी एजंटने घरी ठेवलेले रोख 41 हजार 370 रुपये असा एकूण 12 लाख 30 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल व एजंटकडील मोबाईल व रोख रक्कम असा 25 हजार पाचशे रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर अलराई नगरातील अनिल चव्हाण यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरही सट्टा खेळला जात होता. तेथून मोबाईल, ट्रान्समिशन सिस्टम, दुचाकी वाहने, कार आणि रोकड असा एकूण 26 लाख 54 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक उमेश धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक श्री.धांडे, पोलिस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे, बाबूराव म्हेत्रे, रियाज शेख, निंबाळकर, अल्ताफ काझी, प्रेमेंद्र खंडागळे, सर्जेराव थोबडे, सचिन वाकडे, नारायण गोलेकर, दिलीप राऊत, विजयकुमार भरले, रवी माने, बाळू चमके, आसिफ शेख, पांडुरंग काटे, सचिन गायकवाड, सागर शिंदे, अनिसा शेख, नाझनीन मड्डी, दीपक जाधव, विशेष पथकातील अंकुश मोरे, बुरजे, गणेश शिंदे, अक्षय दळवी, अभिजित ठाणेकर, श्रीकांत जवळगे, विलास पारधी, अमोल जाधव, सुरेश लामजाणे, सचिन कांबळे, बाळराजे घाडगे, सागर ढोरेपाटील, कृष्णा लोंढे, विष्णू बडे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. 

हे आहेत आरोपी : -

नाथा जाधव (रा. एकतपूर रोड, ड्रिमसिटी अपार्टमेंट, सांगोला), दीपक बाबर (रा. वासुदरोड, सांगोला), गणेश निंबाळकर (रा. धनगरगल्ली, सांगोला), अब्बास पटेल (रा..म्हस्के कॉलनी, सांगोला), अनिल किसन जाधव (वय 43, रा. अलराईनगर, सांगोला), सुनील आनंदा भोसले (रा. बेहरे चिंचोली, सोलापूर), कृष्णा प्रभाकर साळुंखे (वय 26, रा. कुंभार गल्ली, सांगोला), युवराज शिवाजी मेटकरी (वय 24, रा. गोंधळेगल्ली, सांगोला) यांच्या विरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: IPL Team Sangola Mobile Car with 39 Lakh Seized