सेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक - छत्रपती संभाजीराजे

दत्तात्रय खंडागळे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

आज रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शेतीची उत्पादन क्षमता कमी होत आहे. तसेच मानवाचे आरोग्य धोक्यात आहे. रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक आहे, असे खासदार संभाजीराजे भोसले यांनी सांगितले. 

संगेवाडी (सोलापूर) : आज रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शेतीची उत्पादन क्षमता कमी होत आहे. तसेच मानवाचे आरोग्य धोक्यात आहे. रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक आहे, असे खासदार संभाजीराजे भोसले यांनी सांगितले. 

मेडशिंगी येथील नव्याने राजलक्ष्मी ऑरगॅनिक लिक्विड अँड फर्टिलायझड या सेंद्रिय खत प्रकल्पाच्या उद्‌घाटन समारंभाप्रसंगी खा. संभाजीराजे भोसले बोलत होते. सांगोला तालुक्यासारख्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सेंद्रिय खते, सेंद्रिय शेती पारंपारिक पशुसंगोपन जोपासले पाहिजे. सेंद्रिय शेतीला भविष्यात चांगले दिवस येणार आहेत सेंद्रिय शेतीपासून तयार झालेल्या शेतीमालाला देखील चांगला भाव मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळाची पाऊले ओळखून सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहन त्यांनी केले.

माजी केंद्रिय मंत्री प्रतिक पाटील, राष्ट्रवादीचे दिपक साळुंखे पाटील, सुरेश शेंडगे, डॉ. रमेश इंगवले-पाटील, उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, नगरसेवक सतिश सावंत, राजू मगर, श्रीकांत देशमुख, नगरसेवक गजानन भाकरे, अरविंद केदार, संजय देशमुख, दत्ता टापरे, डॉ. विजय बाबर, डॉ. विजयसिंह इंगवले, डॉ. रेश्मा हेगडे, डॉ. प्रशांत तेली, संजय रुपनर, सुरेश इंगवले-पाटील, जालिंदर माने आदी यावेळी उपस्थित होते.

तसेच, दिपक साळुंखे व कंपनीच्या प्रमुख सल्लागार डॉ. रेश्मा हेगडे यांनी यावेऴी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंपनीचे आध्यक्ष अजयसिंह इंगवले यांनी केले.

Web Title: It is necessary to turn organic farming says chatrapati sambhajiraje