धनगर आरक्षणाबाबत आता अंतिम लढाईची वेळ - उत्तमराव जानकर

mohol
mohol

मोहोळ (सोलापूर) : धनगर आरक्षणाबाबत आता अंतिम लढाईची वेळ आली असून आरक्षणाबाबत समाजाची घोर फसवणुक करणाऱ्या राज्यकर्त्यांना धनगर समाज कधीच माफ करणार नाही. पण त्यासाठी राजकीय जोडे बाहेर ठेऊन एकत्रीत लढा उभारण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी केले.                     

धनगर समाजाच्या हक्काच्या एसटी आरक्षणाबाबत सरकारला अंतीम इशारा देत शंभर दिवसाचा कालावधी देण्यात येणार आहे. यासाठी 1 ऑगस्टला पुणे येथे बालगंधर्व सभागृह येथे आरक्षणाचा अंतीम निर्णायक लढा देण्यासाठी राज्यस्तरीय मेळावा होणार आहे. यासाठी तालुक्यातील धनगर समाज बांधवाबरोबर नियोजनाची बैठक हॉटेल सुखसागर येथे आयोजित केली होती. यावेळी जानकर बोलत होते. यावेळी भाजपाचे स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर यांनी ही पक्षापेक्षा समाज प्रिय असुन सत्तेतल्या आपल्याच समाज बांधवांना नावे ठेऊन प्रश्न सुटणार नसल्याचे सांगितले. 

यावेळचे माजी सभापती मच्छींद्र ठावरे, शंकरराव काळे -पाटील, पं. स. सभापती समता गावडे, संजय क्षीरसागर, रामभाऊ खांडेकर, यशवंत नरुटे, नगरसेवक अतुल गावडे, सुशील क्षिरसागर, सोमेश क्षिरसागर, बाळासाहेब वाघमोडे, अनंता नागणकेरी, शामराव पाटील, कृष्णदेव वाघमोडे, विनायक मोटे, धनाजी पुजारी, आबा चेंडगे, धनाजी वाघमोडे, बीरमल खांडेकर, शहाजी कोळेकर, गणेश गावडे, बिरूदेव देवकते, भुंजग मळगे, सिध्देश्वर आवारे, सागर लेंगरे, आदीसह बहुसंख्य समाज बांधव  उपस्थित होते.                 

राज्यसरकारने धनगर समाजाच्या आरक्षण न देण्यासंदर्भात 962 पानी अफेडेव्हीट सादर केल्याच्या निषेधार्थ मोहोळ तालुक्यातील धनगर समाजाने बैठकीतच  काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com