जलयुक्त शिवार हे आता काम राहीले नसुन ती चळवळ झाली आहे :सहकारमंत्री सुभाष देशमुख

sahakar-matri.jpg
sahakar-matri.jpg

मोहोळ : जलयुक्त शिवार हे आता काम राहीले नसुन ती चळवळ झाली आहे प्रत्येकाने आपापल्या परिने यात योगदान दिले तर भुगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे स्वखर्च व लोकवर्गणीतुन सतिश काळे यांनी सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

भाजपाचे मोहोळ तालुका अध्यक्ष सतीश काळे यांनी स्वखर्च व लोकसहभागातुन मोहोळ शहराजवळील व राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जुना ओढा सरळीकरण व खोलीकरण या पंधरा लाख रुपयाच्या कामाचा शुभारंभ मंत्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर होते. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश काळे तहसीलदार किशोर बडवे इंद्रजीत पवार सहकारी संस्थांचे निबंधक जिजाबा गावडे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष सुरेश राऊत शहराध्यक्ष अजय कुर्डे नगरसेवक सुशील क्षिरसागर उद्योजक सोमेश क्षीरसागर माजी जिल्हा परिषद सदस्या शुभांगी क्षीरसागर नागेश क्षिरसागर रामदास झेंडगे तलाठी बागल अजय गावडे माहिला आघाडीच्या अध्यक्षा अंजली काटकर सुनील चव्हाण समाधान काळे शहाजी मोटे मदन लाळे बापु पवार विष्णु मेलगे तानाजी बनसोडे आदीसह तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

सुमारे अडीच किमी लांब दोन मिटर खोल व तीन मिटर रुंदी या काळे यांनी हाती घेतलेल्या  कामात पावसाळ्यात सुमारे दिड कोटी लिटर पाणी साठा होणार असुन परिसरातील विहिरी व बोअर यांच्या सह भुगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. मंत्री देशमुख हे भाजपाच्या तालुका कार्यालयात गेल्यावर शेतकऱ्यांनी महावितरणणे चुकीच्या पध्दतीने नदी काठचा विज पुरवठा खंडीत केल्याच्या तक्रारी केल्या तर पत्रा चाळीतील महीलांनी आम्ही राहात असलेल्या जागा नावावर करण्याबाबतचे निवेदन दिले .सर्वांच्या अडचणी बाबत संबंधीताशी बोलुन त्यातुन मार्ग काढण्याचे अश्वासन मंत्री देशमुख यांनी दिले. प्रारंभी अध्यक्ष काळे यांनी मंत्री देशमुख यांचा पुष्पहार देऊन सत्कार केला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com