जलसमृद्धी यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजनेस मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

नगर  - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत, तसेच जल व मृद्‌संधारणाची कामे करण्यासाठी जलसमृद्धी (अर्थमूव्हर्स) यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजनेस सात जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नगर  - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत, तसेच जल व मृद्‌संधारणाची कामे करण्यासाठी जलसमृद्धी (अर्थमूव्हर्स) यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजनेस सात जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जानेवारी 2018 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली असून, यासाठी 13 एप्रिलपर्यंत अर्जदारांनी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकृत परवानाधारक असलेल्या वित्तीय संस्थांकडून कर्जमंजुरीचे पत्र सादर करणे अपेक्षित होते. 15 अर्जदारांनी योजनेअंतर्गत विनाअट कर्जमंजुरीचे पत्र सादर केले असून, त्यांच्याशी त्रिपक्षीय करार करून कर्ज वितरित करण्यासाठी 19 मेपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र हे होऊ न शकल्याने आता ही मुदत सात जूनपर्यंत वाढविली आहे.

Web Title: jalyukta shivar finance scheme