लोकांची घरे पाडून रुंदीकरण कशासाठी? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

ताकारी - कऱ्हाड-तासगाव रस्त्यावर एवढी रहदारी नाही. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करणे योग्य नाही. नागरिकांची घरे, दुकाने पाडून रुंदीकरणाची काय गरज आहे? या सरकारला कामे करून दाखवायची आहेत; म्हणूनच राज्य शासनाकडे पैसे नसतानाही रस्त्यांच्या कामाचा धडाका लावला आहे, असा उपरोधिक टोला आमदार जयंत पाटील यांनी लगावला. 

ताकारी (ता. वाळवा) येथील कऱ्हाड-तासगाव रस्त्यालगत ज्यांची घरे व दुकाने आहेत ते ग्रामस्थ व व्यापारी कऱ्हाड-तासगाव रस्त्याच्या रुंदीकरणामुळे चिंताग्रस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर येथील ग्रामपंचायत सभागृहात कऱ्हाड- तासगाव रस्त्याच्या रुंदीकरणामुळे येथील व्यापारी व ग्रामस्थांच्या दुकाने व घरांचे होणारे नुकसान कसे टाळता येईल यावर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आमदार जयंत पाटील बोलत होते. राजारामबापू पाटील दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, इस्लामपूरचे बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

विनायकराव पाटील म्हणाले,""ताकारीचे बरेचसे क्षेत्र शासकीय योजना व कार्यालयांसाठी संपादित झाले आहे. दक्षिणेला कृष्णा नदी व उत्तरेला डोंगर नेमके ताकारीतच दोन्ही बाजूनी पुढे आले आहेत. या नैसर्गिक रचनेमुळे ताकारी गावाला तसे कमीच क्षेत्र लाभले आहे.'' यावेळी माजी सरपंच विशाल पाटील, उपसरपंच कमलाकर भांबुरे, कुमार टोमके, प्रकाश सपाटे, रमेश पाटील, दीपक शहा, संजय शहा, सुभाष शहा, सतीश शहा, ग्रामविकास अधिकारी ए. आर. सनदे, उत्तम चव्हाण, शंकर पाटील, प्रताप पाटील, धोंडिराम सावंत, संदीप पाटील उपस्थित होते.