'चांगभलं'च्या गजराने जोतिबा डोंगर दुमदुमला

राजकुमार चौगुले
सोमवार, 10 एप्रिल 2017

सासनकाठी नाचविताना हलगी घुमक, कैताळ, झांज ढोल, ताशाच्या गजराने डोंगरालाही ताल धरायला लावला. जोतिबाच्या भक्तीत लीन झालेले भक्त वाद्यवृन्दाच्या निनादात देहभान विसरून सासनकाठ्यांचा बॅलन्स सांभाळत नृत्य करणाऱ्या भक्तांनी जोतिबा डोंगराने उत्साह अनुभवला.

वाडी रत्नागिरी जि कोल्हापूर - चांगभलंचा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा सोमवारी (ता.10) उत्साहात संपन्न झाली. 

सासनकाठी नाचविताना हलगी घुमक, कैताळ, झांज ढोल, ताशाच्या गजराने डोंगरालाही ताल धरायला लावला. जोतिबाच्या भक्तीत लीन झालेले भक्त वाद्यवृन्दाच्या निनादात देहभान विसरून सासनकाठ्यांचा बॅलन्स सांभाळत नृत्य करणाऱ्या भक्तांनी जोतिबा डोंगराने उत्साह अनुभवला.

पहाटेपासूनच हलगीच्या ठेक्यावर डोंगरावर मानाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या. कर्नाटक, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून भाविक सासनकाठ्यांसह दाखल झाल्याने डोंगर अक्षरश: फुलून गेला होता. पहाटे पन्हाळा तहसीलदार रामचंद्र चोबे, यांच्याहस्ते झाला. प्रांतताधिकारी अजय पवार, देवस्थानचे सचिव विजय पवार आदी उपस्थित होते. दुपारी एक वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी डॉ अमित सैनी आदींच्या उपस्थितीत सासन काठ्यांचे पूजन झाले. 

रविवारी सायंकाळी मानाची निनाम पाडळी (जि. सातारा), किवळ (कऱ्हाड), मौजे विहे (ता. पाटण, सातारा), कसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) या मानाच्या सासनकाठ्यांचे यमाई मंदिरात मिरवणुकीने आगमन झाले. सोमवार सकाळपासून जोतिबाकडे येणारे सर्व मार्ग गर्दीने फुलून गेले. या मार्गावर असणाऱ्या गावातील अनेक नागरिकांनी भक्तांना प्रसादाचे वाटप केले.

Web Title: Jyotiba yatra in wadi ratnagiri

व्हिडीओ गॅलरी