सोनू, तुझा नेत्यांवर भरोसा नाय का?

सोनू, तुझा नेत्यांवर भरोसा नाय का?

कलेढोण - सोनू, तुझा नेत्यांवर भरोसा नाय का? 
सरपंचाची माळ कशी गोल गोल,
हा सगळा खुर्चीचा खेळ खेळ,
खुर्चीचा आकार कसा गोल-गोल, 
आतातरी उमेदवारी सोड-सोड... 

अशीच अवस्था जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची (सोनू) झाली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांकडे उमदेवार हेलपाटे मारत असताना दिसत आहेत. सरपंच जनतेतून निवडण्यात येणार असल्याने नेतेही उमदेवारी निवडताना सावध पवित्रा घेत आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिय सुरू असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवार चाचपणी करून नाराजांना थोपवणे, भावकीचे मत विचारात घेणे, उमेदवाराची आर्थिक कुवत, समाजात असलेली प्रतिमा, जनमत आदींचा विचार करत गावोगावचे नेते व्यस्त दिसत आहेत. सरपंचांना पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्याच्या उमेदवारीपेक्षा सरपंचपदाच्या उमेदवारीकडे गावातील नेते लक्ष देऊन आहेत. 

परगावच्या उमेदवारांचा पत्ता कट?
सरपंच हा गावच्या विकासकामांना वेळ देणारा, समस्या सोडविणारा असावा. त्यासाठी पूर्वीसारखा चांगले जनमत असणारा मात्र व्यवसायानिमित्त परगावी असणाऱ्या उमेदवारांचा पत्ता कट होणार आहे. त्यासाठी स्थानिक मात्र आपल्या विचारांच्या उमेदवारावर सरपंचपदाची माळ गळ्यात पडेल, अशीच चर्चा आहे.        

उमेदवाराचं ‘दिवाळं’, मतदारांची ‘दिवाळी’
ऐन दिवाळीच्या तोंडावरच्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या सर्वसामान्य उमेदवारांना मतदारांचे चोचले पुरविताना नाकीनऊ येणार आहे. वॉर्डातील हावशे, गवशे, नवशे, परगावी असलेल्या मतदारांच्या खर्चासाठी त्यांना खिशात हात घालावा लागणार आहे. त्यामुळे उमेदवाराचं ‘दिवाळं’ निघणार, तर मतदारांची ‘दिवाळी’ साजरी होणार आहे, हे नक्की.

सरपंचावर नेत्याची ओळख
ग्रामपंचायतीत आपल्या विचाराच्या उमेदवारांचे बहुमत असले तरी, सरपंच कोणाच्या विचाराचा आहे, त्यावर गावातील नेत्याची प्रतिष्ठा अवलंबून आहे. त्यामुळे स्थानिक नेते सरपंच उमेदवार निवडीत घाई करत नसल्याचे दिसून येत आहे.

इच्छुक उमेदवारांच्या नेत्यांकडे चकरा
सरपंच अथवा सदस्यपदासाठी आपणच कसे योग्य आहोत, आपल्याविषयी नेत्याजवळ कुरघोडी करतंय का? नेत्याचे ज्यांच्याविषयी चांगले मत आहे. मात्र, जनमत असूनही इच्छुक नसणाऱ्याच्या गाठीभेटी घेणे, या साऱ्यामुळे इच्छुक उमेदवारांचे चांगलेच हाल होत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com