पर्यावरण जागृतीसाठी 50 लाख रक्षक सज्ज! 

पर्यावरण जागृतीसाठी 50 लाख रक्षक सज्ज! 

कऱ्हाड - पर्यावरण रक्षणासह वृक्ष लागवड व त्याच्या संवर्धनासाठी राज्यभरातून सुमारे 50 लाख पर्यावरणप्रेमी पुढे सरसावले आहेत. राज्यामध्ये वृक्ष लागवड व संवर्धन सक्षमपणे व्हावे, यासाठी शासनाने हरित सेना स्थापन केली आहे. या सेनेत राज्यभरातून 50 लाख सदस्य सक्रिय सहभागी झाले आहेत. त्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. संबंधित पर्यावरणप्रेमींनी त्यांच्या आवडीनुसार नोंदणी केली आहे. पुढील तीन वर्षांत नोंदणी एक कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. वृक्षलागवडीसह त्याच्या संवर्धनाच्या जागृतीसाठी फेसबुक, व्हॉट्‌सऍप, ट्युटर, मेसेंजेर, मेलचा जास्तीतजास्त वापर  करण्यात येणार आहे. त्यासह सामान्यांतही जागृतीची जबाबदारी हरित सेनेच्या सदस्यांवर आहे. 

पर्यावरण रक्षणासह वृक्ष लागवड व त्याच्या संवर्धनासाठी शासनाने महाराष्ट्र हरित सेनेची स्थापना केली आहे. त्याचे सदस्यत्व वर्षापासून खुले आहे. मे अखेरीपर्यंत राज्यभरातून सुमारे 50 लाख पर्यावरणप्रेमींनी हरित सेनेचे सभासदत्व भरले होते. ते सदस्यत्व संबंधितांनी त्यांच्या आवडीनुसार भरले आहे. त्यामुळे वृक्ष संवर्धनाच्या कामाला गती येणार आहे. वर्षभरात एक कोटी सदस्य करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रसार केला जाणार आहे. सक्रिय झालेल्या सदस्यांनी पहिल्या टप्प्यात निसर्ग समजावून घेण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. त्याशिवाय हरित सेनेचे नेमके काम होणार याचा कृती आराखडा आखला जात आहे. त्यासाठी राज्यस्तरावर आठ, वन वृत्तस्तरावर सहा आणि जिल्हास्तरावर चार सदस्य अशा तीन समित्यांची स्थापना झाली आहे. त्या समित्यांचा अहवाल आल्यानंतर हरितसेनेचा आराखडा स्पष्ट होणार आहे. वनविभागाचे प्रधान मुख्य वनसरंक्षक राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष आहेत. तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसरंक्षक त्याचे सचिव आहेत. त्यात वन विभागाच्या व्यवस्थापन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरणाचे प्रधान वनसंरक्षक, अर्थसंकल्प विभागाचे अतिरिक्त प्रधान वनसरंक्षक, वन विभागाचे सहसचिव, हरित सेनेचे नोंदणीकृत जिल्हास्तरीय एक आणि वृत्तस्तरावर हरित सेनेच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. वृत्तस्तरावरील समितीचे अयुक्त अध्यक्ष आहेत. सामाजिक वनीकरणाचे वनसंरक्षक सचिव आहेत. त्यामध्ये प्रादेशिक वनीकरणाचे मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकारी दर्जाचे दोन अधिकारी, प्रादेशिक मुख्य वन संरक्षक, दोन हरित सेनेचे सदस्य यांचा त्यात समावेश आहे. जिल्हाधिकारीस्तरावरील समितीचे जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत. "प्रादेशिक'चे उपवनसंरक्षक सचिव आहेत. सामाजिक वनीकरणाचे विभागीय वन अधिकारी व हरित सेनेच्या चार सदस्यांचा त्यात समावेश आहे. 

निर्णयातील महत्त्वाचे... 

* पर्यावरण जागृतीसह वृक्षलागवड, संवर्धन, संरक्षण व देखभालीची जबाबदारी हरित सेना सदस्यांची 
* जागृतीसाठी सदस्यांना रॅली फॉर रिव्हर कार्यक्रम राबवण्याची मंजुरी 
* वन्यजीव व्यवस्थापनातही हरित सेनेच्या सदस्यांचा राहणार सक्रिय सहभाग 
* वन संरक्षण गस्तीसाठीही सदस्यांची घेणार मदत 
* मानव व श्वापद यांच्या संघर्ष संपवण्यासाठी उपाययोजनातही सदस्य राहणार सक्रिय 
* वणवा प्रतिबंध व अकस्मात आगीवरील उपाययोजनात सदस्य राहणार सल्लागार 
* वन विभाग व पर्यावरणाच्या विविध कार्यक्रमातही सदस्य सक्रिय राहणार 
* वन्य प्राणी गणना करण्यासाठी सदस्यांना राहणार प्राधान्य 
* वन्य जीव संरक्षण व संवर्धनासाठीही सदस्यांचा सहभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com