नगरसेविका पतींच्या उचापतींत वाढ?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

कऱ्हाड - पालिकेच्या काही विभागांबाहेर नगरसेविकांचे पती, नातेवाईकांच्या पालिकेच्या बैठकीतील उपस्थितीसंदर्भातील शासनाचे परिपत्रक लावण्यात आले आहे. त्यामुळे नेमक्‍या कोणत्या नगरसेविकेच्या पतीच्या उचापती वाढल्या, की नातेवाईकांचा कारभारात हस्तक्षेप वाढला, याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. 

गेल्या आठवड्यापासून पालिकेतील अनेक विभागांबाहेर २० जुलै १९९३ रोजी नगरपालिका महिला सदस्यांच्या पतींची, नातेवाईकांची पालिकेच्या बैठकीत उपस्थिती या संदर्भात काढलेले शासन परिपत्रक लावण्यात आले आहे. त्यामुळे सहाजिक यापूर्वी न दिसणारे हे परिपत्रक कोणाच्या तरी हस्तक्षेपामुळे लावल्याचे स्पष्ट होत आहे. 

त्यामुळे नेमका कोणत्या नगरसेविकेच्या पतीचा किंवा नातेवाईकाचा हस्तक्षेप वाढला, याबाबत पालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे. पालिकेत नगराध्यक्षांसह ३३ नगरसेवक आहेत. त्यात १६ महिला सदस्या आहेत. त्यात सत्तारूढ, विरोधी नगरसेविकांचा समावेश आहे. १६ पैकी महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, भाजपच्या नगरसेविका विद्या पावसकर स्वत: कारभारात सक्रिय आहेत. उर्वरितपैकी दहा नगरसेविकांचे पती, तीन नगरसेविकांचा मुलगा राजकारणात सक्रिय असल्याने त्यांचा पालिकेत सातत्याने वावर दिसतो. त्यामुळे यातील नेमका कोणाचा हस्तक्षेप वाढला? याची चर्चा सुरू आहे. काहींचा टेंडरमधील इंटरेस्ट, परस्पर फाईल हाताळणे आदी प्रकार घडल्याच्या चर्चा आहेत. त्यातच थकीत कराच्या वसुलीची फाईल गायब होण्याच्या प्रकारामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, या परिपत्रकामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘सु’नियो‘जित’कामासाठी पत्रक!
 दरम्यान, यासंदर्भात प्रशासनाशी संपर्क साधला असता अद्याप लेखी तक्रार आली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम करताना ‘सु’नियो‘जित’काम करता यावे, यासाठी परिपत्रक लावण्यात आल्याचे बोलले जाते.