कऱ्हाडला २२ गावांत दुरंगी, चार गावांत तिरंगी लढत

कऱ्हाडला २२ गावांत दुरंगी, चार गावांत तिरंगी लढत

कऱ्हाड - तालुक्‍यातील निवडणूक लागलेल्या ४४ ग्रामपंचायतींपैकी सात गावांतील सरपंच बिनविरोध झाले आहेत, तर पहिल्यांदाच सरपंचांची थेट निवड असूनही संबंधित प्रवर्गातील उमेदवारच त्या गावात नसल्याने घराळवाडी, घोलपवाडी, चोरजवाडी, वानरवाडी या चार गावांचे सरपंचपद रिक्त राहिले आहे. निवडणूक लागलेल्या गावांपैकी जुने कवठे, कुसुर, शामगाव आणि तळबीडमध्ये तिरंगी, २२ गावांत दुरंगी लढती होत असून, सात ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. 

तालुक्‍यातील ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर ४० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली आहे. निवडणूक लागलेल्या गावांपैकी जुने कवठे, कुसुर, शामगाव आणि तळबीड येथे तिरंगी लढत होत आहे. जुने कवठे येथील नऊ जागांसाठी २५ तर सरपंचपदासाठी पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. कुसुर येथील नऊ जागांसाठी २७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर सरपंचपदासाठी तीन उमेदवार आहेत. शामगाव येथील नऊ जागांसाठी ३३ उमेदवार, तळबीडच्या १३ जागांसाठी ३९ आणि सरपंचपदासाठी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. २२ गावांमध्ये दुरंगी लढत होत  आहे. त्यामध्ये आणे येथील नऊ जागांसाठी १८, आरेवाडीतील सात जागांसाठी १४, दुशेरेतील नऊ जागांसाठी १८,  आटकेतील १३ जागांसाठी २६, गोंदीतील नऊ जागांसाठी १९, जुळेवाडीतील ११ जागांपैकी दोन जागा बिनिरोध होऊन १७ उमेदवार रिंगणात आहेत. पाडळी हेळगाव येथील नऊ जागांसाठी १८ उमेदवार असून, दोन पॅनेलमध्ये निवडणूक होत आहे. रेठरे खुर्द येथील ११ जागांसाठी २२ उमेदवार असून, सरपंचपदासाठी दोन उमेदवार आहेत. साबळेवाडीतील सात जागांपैकी एक जागा बिनविरोध झाली असून, उर्वरित सहा जागांसाठी १२ जण रिंगणात आहेत. तारुख येथील नऊ जागांसाठी २० उमेदवार तर अंतवडीतील सात जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. डेळेवाडीतील सात जागांपैकी एक जागा बिनविरोध तर एक जागा राखीव राहिल्याने पाच जागांसाठी दहा उमेदवार रिंगणात आहेत. कालगावच्या नऊ जागांसाठी २२ तर सरपंचपदासाठी तीन, कासारशिरंबेच्या ११ जागांसाठी २२,  ओंडोशीच्या सात जागांसाठी १४, सुपनेतील ११ जागांसाठी २३, वडगाव हवेलीतील १५ जागांसाठी ३०, येळगावच्या ११ जागांपैकी एक बिनविरोध झाली असून दहा जागांसाठी २० उमेदवार, पश्‍चिम सुपनेच्या सात जागांपैकी एक बिनविरोध झाली असून १२ उमेदवार रिंगणात आहेत. चरेगावच्या १३ जागांसाठी थेट दोन पॅनेलमधील २६ उमेदवारांत लढत होत आहे.  

अंशतः बिनविरोध 
निवडणूक लागलेल्या घराळवाडीतील सात जागांपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या असून, तेथील सरपंचपद आणि दोन सदस्यपदे रिक्त असून चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. घोलपवाडीतील सरपंचपद रिक्त आहे. सात जागांपैकी दोन जागा रिक्त राहिल्या असून दहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चोरजवाडीत एका जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक लढवत असून तेथील सरपंचपद आणि दोन जागाही रिक्त राहिल्या आहेत. धावरवाडीतील सात जागांपैकी चार बिनविरोध झाल्या असून तीन जागांसाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. हवलेवाडीतील सात जागांपैकी पाच बिनविरोध झाल्या असून, दोन जागा रिक्त राहिल्याने तेथे सरपंचपदासाठी दोन उमेदवार नशीब आजमावत आहेत. मनु येथील नऊ जागांपैकी सात जागा बिनविरोध झाल्या असून दोन जागांसाठी उमेदवार तर सरपंचपदासाठी दोन उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 

बिनविरोध सरपंच
 तालुक्‍यातील वनवासमाची (खोडशी) येथील बापूराव सुतार, चिंचणी येथील श्रीमती गिता अनपट, कळंत्रेवाडीतील श्रीमती लता जगताप, गणेशवाडीतील श्रीमती लक्ष्मी, भांबे येथील जनार्दन मोरे, मस्करवाडीतील श्रीमती अरुणा माने आणि हनुमानवाडीतील उत्तम कदम हे सरपंच बिनविरोध झाल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. 

विजयनगरला निवडणूक 
विधान परिषदेचे आमदार आनंदराव पाटील यांचे गाव म्हणून जिल्ह्यात परिचित असणाऱ्या विजयनगर ग्रामपंचायतीच्या सात जागांपैकी सातही जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, तेथे सरपंचपदासाठी निवडणूक लागली आहे. सरपंचपदासाठी तेथे दोन उमेदवार नशीब आजमावत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com