कर्जमाफीच्या अर्जांचा घोळ कायम

हेमंत पवार
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

ऑनलाइनची मुदत आठवड्यावर येऊनही सर्व्हर डाऊनच 
कऱ्हाड - सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अट घालण्यात आली आहे. त्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. सध्या महा ई सेवा केंद्र, सोसायटी, ग्रामपंचायतीसह अन्य ठिकाणी अर्ज भरण्यासाठी गर्दी आहे. ग्रामीण भागात नेटच्या रेंजसह सर्व्हर डाऊन होत असल्याने शेतकरी दांपत्यांना काम सोडून अर्ज भरण्याच्या ठिकाणी दिवसभर ताटकळावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी वैतागलेत. 

शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्जाद्वारे माहिती भरून देणे बंधनकारक आहे. मध्यंतरी जिल्ह्यातील अनेक गावे ऑनलाइनच्या अर्जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यावरून शेतकरी संघटनांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे आंदोलनचा इशारा दिला. प्रशासनाने राहिलेल्या गावांची नावे पुन्हा नव्याने घातली. अजूनही काही गावे त्या यादीत नाहीत. ग्रामीण भागात नेटच्या रेंजची अडचण आहे. अर्ज भरता येत नसल्याने शेतकऱ्यांना पदरमोड करून शहरात यावे लागत आहे. शहरातील महा ई सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. त्यातच सरकारने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत आहे. अर्ज भरण्यासाठी केवळ सातच दिवस राहिल्याने शेतकरी काहीही करून अर्ज भरण्यासाठी धावपळ करत आहेत. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे सर्व्हरच साथ देत नाही. अनेक केंद्रांवर शेतकऱ्यांना दिवसभर काम सोडून अर्ज भरण्यासाठी थांबावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. 

दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. त्यासाठी अनेक नियम व अटी घातल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचीच असेल, तर ज्या बॅंकांनी कर्ज दिले त्यांच्याकडून यादी घेऊन सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत. शेतकऱ्यांना ऑनलाइनच्या भानगडीत न अडकवता त्यांना थेट लाभ द्यावा, अशा मागणीचा ठराव कऱ्हाड पंचायत समितीत करण्यात आला आहे. 

सरकारने कर्जमाफी देण्यासाठी अनेक नियम व अटी घातल्या आहेत. ग्रामीण भागात रेंजची अडचण असल्याने अर्ज भरले जात नाही. त्यातच सर्व्हर डाऊन होत असल्याने शेतकऱ्यांना अर्जासाठी दिवसभर ताटकळावे लागत आहे.
- सचिन नलवडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: karad news loanwaiver form confussion