रेल्वेखाली उडी मारून ज्वेलर्स दुकान मालकाची आत्महत्या

Rahul-Phalake
Rahul-Phalake

कऱ्हाड - नोटबंदी व जीएसटीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या येतील मुक्य बाजारपेठेतील मंगलमूर्ती ज्वेलर्सचे मालकांनी कोपर्डे हवेली येथील रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. राहुल राजाराम फाळके (वय 32, रा. वनवासमाची) असे संबधिताचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येची नोंद पोलिसात झाली आहे. मात्र कारम समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र राहूल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्या फेसबुक औकोंटवर आत्महत्येचे कारण अपडेट करून आत्महत्या केल्याने कळबळ उडाली आहे.  

राहूल फाळके यांचे वनवासमाची मुळ गाव आहे. त्यांनी येथील मारूती मंदीर चोकात मुख्य बाजारपेठेत पाच वर्षापूर्वी त्यांनी मंगलमूर्ती ज्वेलर्स सुरू केले.

प्रत्येकाशी मनमिळावूपणे बोलण्याच्या त्यांच्या सवयीमुळे ते परिसरात परिचीत झाले होते. त्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त बाजारपेठ वाऱ्यासारखे पसरले होते. त्याची नोंद पोलिसात झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, राहूल फाळके यांनी आज दुपारी एकच्या सुमारास कोपर्डे हवेली येथील रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. एकाने रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्यांनी त्वरीत लोक कर्मचारी पाठवले. त्याचवेळी त्यांनी रेल्वे पोलिसांनाही तेथे बोलावले.

प्रत्यक्ष घटनास्थळी पोलिस पोचले. त्यावेळी संबधिताच्या किशात काही कागद सापडले. त्यावरून त्यांची ओळख पटली. त्यांनी रेल्वेखाली उडी घेतली. ते पूर्ण रेल्वे खाली गेले नाहीत. त्यांचा हात रेल्वेखाली सापडल्याने ते सुमारे पन्नास फुट फरपडत गेले. त्यात त्यांना मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. राहूल फाळके यांच्या मृत्यूची नोंद माहिती तालुका पोलिसात झाली आहे. फाळके यांनी आत्महत्या केल्याचे बाजारपेठेतही वाऱ्यासारखी माहिती पसरली होती. आज सकाळीही राहूल यांनी नेहमीप्रमाणे दिकान उघडले होते. ते दुकानात जाताना मुलालाही शाळेत सोडायचे आजचाही दिनक्रम त्यांनी असाच केला. नेहमीप्रमाणे राहुल मुलाला घेऊन घरातून बाहेर पडले. शाळेत सोडल्यानंतर त्यांनी दुकान उघडले. काही काळासाठी दुकानं उघडलं, नंतर त्यांनी बंद केले. मात्र त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या त्यांच्या आत्महत्येचीच बातमी येवू धडकली. 

राहूल फाळके यांनी दुपारी एकच्या आत्महत्या केली. त्यापूर्वी काही मिनीट आधीच राहूल यांनी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी अपडेट टाकले होते. त्यात त्यांनी सर्वाना माझा शेवटचा नमस्कार अशा मथळ्याखाली आत्महत्या करत अशल्याचे सांगून आत्महत्या केली आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. त्यांनी फेसबुकवर अपडेट केलेला मजकुरातील माहिती अशी ः जेव्हापासून मोदींनी नोट बंदी केली. तेंव्हापासून सोने चांदी व्ययवसायाला उतरती कळा लागली आणि हे कमी कि काय म्हणून जीएसटी लागू केला. त्यामुळे संपूर्ण व्यवसाय अडचणीत आला. आधीच आमचा व्यावसाय उधारी शिवाय चालत नाही. त्यामुळे उधारीत पैसे अडकले खूप लोकांवर विश्वास ठेवून त्यांना मदत केली खूप जणांना अडचणीतून बाहेर आणले पण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने माझा फक्त विश्वासघात केला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार एक शिवसैनिक म्हणून समाजामध्ये राहताना नेहमी ताठ मानेने जगलो पण आज काही चूक नसताना मन खाली घालुन मी जगू शकत नाही. मला कोणाला हि फसवायच नव्हतं, माझा तसा स्वभावही नाही पण प्रत्येकाने मला फसवले आणि त्यामुळे मला सर्वाना फसवून जायला लागत आहे. आणि माझ्या मृत्यूस कोणालाही जबादार धरू नये. कोणावर हि कोणतीही कारवाई करू नये. माझ जीवन उध्वस्त झालंय, मला कोणाचं आयुष्य उध्वस्त नाही करायचं... अलवीदा..... घरातील सर्वांसह .... माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाला खूप मिस करेन असे स्पष्टपणे नमूद करून तुमचाच राहूल, असे त्यांनी लिहीले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com