ऊसदर आंदोलनाची तोडणी मजुरांना धास्ती

हेमंत पवार
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

कऱ्हाड - उसाच्या पहिल्या हप्त्यासाठी शेतकरी आंदोलनाची धग हळूहळू वाढू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पार्ले येथील ऊसतोडी रोखून जिल्ह्यामध्ये आंदोलनाचा श्रीगणेशा केला.  पहिला हप्ता जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड करू नये, असा पवित्रा संघटनेने घेतला आहे.

या आंदोलनाची धास्ती ऊसतोड मजुरांनी घेतल्यामुळे सध्या काही ठिकाणी ऊसतोडी बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. परिणामी मजुरांवर बसून राहण्याची वेळ आली असून, त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.   

साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना त्यांनी घाम गाळून पिकवलेल्या उसाला चार पैसे जादाचे मिळावेत, यासाठी शेतकरी संघटनांकडून आंदोलनाचे हत्यार नेहमी उपसले जाते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूर येथे ऊस परिषद होऊन तेथे उसाला पहिला हप्ता तीन हजार ४०० रुपये द्यावा, अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयतक्रांती संघटनेने ‘एफआरपी’त अधिक ३०० रुपयांची मागणी केलेली आहे. 

पंजाबराव पाटील यांच्या बळिराजा शेतकरी संघटनेची तीन हजार ५०० रुपये पहिल्या हप्त्याची मागणी आहे. त्यामुळे सध्या पहिल्या हप्त्यासाठी चांगलेच रान तापले आहे. पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय साखर कारखान्यांनी ऊसतोड करू नये व शेतकऱ्यांनीही ती घेऊ नये, असा पवित्रा घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे व कार्यकर्त्यांनी दोनच दिवसांपूर्वी पार्ले येथील ऊसतोड रोखल्याने ऊसदर आंदोलनाची त्या माध्यमातून ठिणगी पडली. त्यामुळे दोन दिवसांपासून काही ठिकाणी ऊसतोड मजुरांनीच ऊसतोडी बंद ठेवल्या आहेत. त्यांनीही आंदोलनाची धास्ती घेतल्याने त्यांच्यावर बसून राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांचेही नुकसान 
ज्या ठिकाणी ऊसतोडी थांबल्या आहेत, त्यापैकी काही शिवारात ऊस तसाच पडून आहे. शेतकरी संघटनांनी पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय ऊसतोड करू नये, असे जाहीर केले आहे. त्यामुळे काही ठिकाणी स्वतः मजुरांनी तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनीच तोडी बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे तोडलेला ऊस शेतातच पडून असल्याने शेतकऱ्यांचेही काही प्रमाणात नुकसान होत आहे.

Web Title: karad satara news agitation for sugarcane rate