कऱ्हाडला भाजप, राष्ट्रवादीचे आज शक्तिप्रदर्शन

हेमंत पवार
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

कऱ्हाड - राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या कारभाराविरोधात ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उद्या (शनिवारी) त्यांच्या येथील प्रीतिसंगमावरील समाधिस्थऴी अभिवादन करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह त्यांच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हल्लाबोल आंदोलनाचा श्रीगणेशा करण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, भाजपनेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण स्मृती अभिवादन यात्रेचे आयोजन केले आहे. त्यामुळे येथे कलगीतुरा रंगणार असून, त्यातून कऱ्हाडला दोन्ही पक्षांचे शक्तिप्रदर्शनही होणार आहे. 

यशवंतराव चव्हाण यांची शनिवारी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री, खासदार, आमदार, नेते, पदाधिकाऱ्यांची दरवर्षी प्रीतिसंगामावरील त्यांच्या समाधिस्थळी मांदियाळी असते. त्यांच्या समाधीस अभिवादन करून संबंधित मान्यवर जात असतात. यंदा मात्र त्या अभिवादनाचे औचित्य साधून राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे आपापल्या पक्षांच्या धोरणाप्रमाणे कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या धोरणाविरोधात आणि फसव्या कर्जमाफीसह अन्य घोषणांच्या विरोधात आंदोलन करण्याचे घोषित केले आहे. त्यात उद्या सकाळी आठ वाजता पक्षाध्यक्ष श्री. पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हल्लाबोल आंदोलन करण्यात येऊन राज्यभर ते पोचवण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण यांचे समाधिस्थळ ते प्रांत कार्यालयादरम्यान त्यासाठी मोर्चा काढून तेथे मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. दरम्यान, भाजपनेही मुख्यमंत्री फडणवीस व महसूलमंत्री पाटील यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण स्मृती अभिवादन यात्रेचे आयोजन केले आहे. उद्या सकाळी सात वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे शक्तिप्रदर्शनच यानिमित्ताने येथे होणार असून, त्यासाठी दिग्गज नेते व मंत्री येथे मुक्कामी आहेत. त्यामुळे येथे उद्या राजकीय कलगीतुराच रंगणार असल्याचे दिसते. 

उद्धव ठाकरेंची उद्या सभा 
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी कऱ्हाड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत दुपारी साडेबारा वाजता ओगलेवाडी येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून दुपारी एक वाजता पालिकेशेजारील जनता व्यासपीठावर त्यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा होणार आहे. पालकमंत्री विजय शिवतारे, खासदार विनायक राऊत, गजानन कीर्तीकर, आमदार शंभूराज देसाई, संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील उपस्थित राहणार आहेत. त्यांनीही सभेसाठी कऱ्हाडच निवडल्याने कऱ्हाडमध्ये कलगीतुराच रंगणार आहे.  

Web Title: karad satara news bjp & ncp power presentation