पुनर्वसन होऊनही अभयारण्यात राहणाऱयांना कारावासची शिक्षा

पुनर्वसन होऊनही अभयारण्यात राहणाऱयांना कारावासची शिक्षा

कऱ्हाड - पूर्नवसन होवूनही अवैधरित्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोनमध्ये राहणाऱ्या नऊ कुटूंबातील ३६ लोकांना प्रत्येकी ५० हजार प्रमाण सुमारे १८ लाखांचा व प्रत्येकी तीन वर्षाचा कारावासाची शिक्षा झाली.

शाहूवाडी तालुक्यातील फौजदारी न्यायालयाना आज निकाल दिला. शिक्षा झालेली कुटूंब निवऴे, सोनार्ली, दुर्गेवाडी व ढाकळे या गावातील आहेत. २०१३ मध्ये संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तब्बल चार वर्षाने  आज निकाल झाला. 

त्याबाबत माहिती अशी - संबधित गावातील नऊ कुटूंबाचे शंभर टक्के पुर्नवसन झाले होते. तरिही त्या कुटूंबातील ३६ सदस्य अवैधरित्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात येणाऱ्या त्या चार गावात राहत होते. त्याबाबत वन्य जीव विभागाने संबधितांना तेथे न राहण्याबाबत तोंडी व लेखी नोटीशीद्वारे कळवले होते. त्या कुटूंबांनी सुमारे ७५० गाय व म्हैशी पाळल्या होत्या. त्याचा वन्य जीवांना त्रास होत होता. त्या जनावरांचे आजार गवे, सांबर यांच्यात पसरण्याचा धोका निर्माण झाला होता.

त्याशिवाय ते लोक तेथे शेती करत होते. अवैध जनावरे चरत होते, वनवा व आगही लावत होते. त्यांना वेळोवेळी सांगूनही ते एेकत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली होती. 

तत्कालीन वनाधिकारी सिताराम झुरे, सहायक वनसंरक्षक सुभाष पुराणीक, वनक्षेत्रपाल भरत माने, मानद वन्य जीव रक्षक अजीत पाटील, रोहन भाटे,  पर्यावरण तज्ञ नाना खामकर यांच्या पथकाने २०१३ मध्ये कारवाई केली. तेथील अतिक्रमण हटवले. त्या संबधित कुटूबांवर गुन्हाही दाखल केला होता.

त्यात नऊ कुटूंबातील ३६ लोकांवर गुन्हा दाखल केला होता. त्याचा खटला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील न्यायालयात सुरू होता. त्यानुसार त्याची सुनावणी झाली. त्यात सरकारी पक्षातर्फे युर्तीवाद करण्यात आला. तो ग्राह्य मानून वरील शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com