विसर्जनानंतर कृष्णेचे पाणी कमी झाल्याने मूर्ती पडल्या उघड्या

krushna river
krushna river

कऱ्हाड : गणेशमुर्ती विसर्जनास दरवर्षीप्रमाणे कृष्णा नदीतील पाण्याचे टेंभू योजनेचे नियोजन यंदाहा फसले आहे. नियोजन कागदावरच रंगले. त्यामुळे मूर्ती विसर्जना अगोदर पाणी पातळी कमी करणे आवश्यक असताना  मूर्ती विसर्जनानंतर ते कमी केले. त्यामुळे विसर्जीत गणेशमूर्ती उघड्या पडल्या.  

दरवर्षीचे ते विदारक चित्र यंदा 
पालिकेचे आरोग्य कर्मचारी, एन्व्हायरो फ्रेंडस नेचर क्लब, अन्य संस्था, संघटना, नागरिक यांच्या तत्परतेने तेवढ्या प्रमाणात दिसले नाही. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत सुचना करुनही टेंभूच्या पाण्याचे नियोजन यंदाही फसल्याचेच स्पष्ट झाले. 

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावांना पाणी मिळावे यासाठी कृष्णा नदीचे पाणी टेँभु येथे अडवुन तेथुन उचलुन ते देण्यात येते. तेथे पाणी अडवल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. दरवर्षी गणेशोत्सवाच्या अगोदर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या उपस्थितीत शांतता समितीची गणेश मंडळांच्या सोबत बैठक होते. त्यामध्ये गेल्या पाच ते सहा वर्षापासुन टेंभू योजनेच्या पाण्याचे नियोजन करण्याचा मुद्दा गाजतो. जिल्हाधिकारी श्वेता  सिंघल, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शांतता समितीच्या  बैठकीत येथील जयंत बेडेकर यांनी टेंभू योजनेच्या पाण्याचा मुद्दा मांडला होता. त्यावेळी  त्यासंदर्भात चर्चाही झाली. नुकतेच पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्यावेळी कृष्णा नदीतील पाण्याची पातळी वाढलेली होती. मात्र काल अचानक नदीपात्रातील पाणी कमी झाले. त्यामुळे नदीपात्रात विसर्जीत करण्यात आलेल्या गणेशमुर्ती उघड्या पडल्या. मूर्ती उघड्या पडल्याने दरवर्षीचे प्रीतिसंगम घाटावर विदारक चित्र दिसते. ते यंदा दिसु नये यासाठी पालिकेचे आरोग्य कर्मचारी, एन्व्हायरो फ्रेंडस नेचर क्लब, अन्य संस्था, संघटना, नागरिकांच्या तत्परतेने  त्या मुर्ती तेथुन पुन्हा विसर्जीत केल्या.  मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत सुचना करुनही टेंभुच्या पाण्याचे नियोजन यंदाही फसल्याचेच स्पष्ट झाले. 

आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान 
कृष्णा नदीचे पाणी कमी झाल्याने प्रीतिसंगमासह नदीकाठी विसर्जीत करण्यात आलेल्या गणेशमूर्ती उघड्या पाडण्यास सुरुवात झाली. त्याची माहिती कळाल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काल पहाटे पाचपासून रात्री साडेसात वार्जेपर्यंत त्या मूर्ती पुन्हा विसर्जीत करण्याचे काम केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com