चांगल्या दृष्टीसाठी मुलांना ठेवा गेम्सपासून दूर - डॉ. यशश्री जोग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

सोलापूर - लहान मुलांमध्ये दृष्टिदोष आणि डोळ्यांचे विकार मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. कॉम्प्युटर व मोबाईल आता आवश्‍यक गरज बनलेली असल्याने ते पाहणे टाळता येत नाही. मात्र, लहान मुलांना गेम्सपासून दूर ठेवल्यास डोळ्यांच्या विकारांपासून दूर ठेवता येते, असे नेत्रविकारतज्ज्ञ डॉ. यशश्री जोग यांनी सांगितले.

सोलापूर - लहान मुलांमध्ये दृष्टिदोष आणि डोळ्यांचे विकार मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. कॉम्प्युटर व मोबाईल आता आवश्‍यक गरज बनलेली असल्याने ते पाहणे टाळता येत नाही. मात्र, लहान मुलांना गेम्सपासून दूर ठेवल्यास डोळ्यांच्या विकारांपासून दूर ठेवता येते, असे नेत्रविकारतज्ज्ञ डॉ. यशश्री जोग यांनी सांगितले.

डॉ. जोग म्हणाल्या, आता कॉम्प्युटरचा अभ्यासासाठी सर्रास वापर होतो. तो मुलांना करू द्यावा. मोबाईल व कॉम्प्युटरवरील गेम्समधील चित्र हे वेगाने फिरत असतात. याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर होतो. म्हणून मुलांना जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळू द्यावेत. आईच्या गर्भात बाळाची व्यवस्थित वाढ न झाल्यास दृष्टिदोष होऊ शकतो. प्रगत तंत्रज्ञानामुळे पूर्ण वाढ न झालेले मूल जन्माला येते; मात्र त्यांना नेत्रदोष असू शकतो. हे टाळण्यासाठी बालरोगतज्ज्ञ बाळाला नेत्रविकार तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठविण्यास सांगतात. पालकांमध्ये याविषयी जागरूकता नसल्याने वेळेवर उपचार मिळत नाहीत. याचा वाईट परिणाम बाळाच्या डोळ्यांवर होतो. काही बालकांमध्ये जन्मजात काचबिंदू किंवा मोतीबिंदू असतो. मात्र पालक हे सत्य स्वीकारताना दिसत नाहीत. यामुळे त्यांच्यावर वेळेवर उपचार करता येत नाहीत. याचा परिणाम त्यांच्या दृष्टीवर होतो. मात्र शस्त्रक्रियेने हे टाळता येते.

‘अ’ जीवन सत्त्वाच्या कमतरते मुळेही नेत्रविकार होतात. हे टाळण्यासाठी पालेभाज्या, गाजर, अंडी, पपई यांचा वापर आहारात करावा. पालकांनी दृष्टिदोष असल्याचे लक्षात आल्यावर वेळीच डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. यशश्री जोग, नेत्रविकारतज्ज्ञ

‘बाळाच्या हालचालींकडे द्या लक्ष’
बाळ लहान असतानाच त्याच्या व्यवहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रांगत असताना बाळ वस्तूला धडकते का? आईला पाहून प्रतिक्रिया देते का? न पाहता फक्त आवाज ऐकून प्रतिक्रिया देते का? हे जर पालकांनी पाहिले तर वेळीच उपचार करणे सोपे होते. काही वेळा लहान बाळाच्या डोळ्यांमध्ये ‘रॅटीनो ब्लास्टोमा’ या नावाचा कॅन्सरही असू शकतो. हे लवकर लक्षात आल्यास व त्यावर योग्य उपचार केल्यास या आजारावर वेळीच मात करता येते, असे डॉ. जोग यांनी सांगितले.