‘पीएम’ साधणार ‘पीआय’शी संवाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

खंडाळा पोलिस ठाण्याचे कामकाज शंभर टक्के ऑनलाइन केल्याची दखल
खंडाळा - सातारा पोलिस दलाने ऑनलाइन तपास प्रक्रियेचा अवलंब सुरू केला आहे. त्यात खंडाळा पोलिस ठाण्याचे उत्कृष्ट असून, या कारभाराची दखल घेत पंतप्रधान नरेंद मोदी हे या पोलिस ठाण्यात आदर्श काम करणाऱ्या पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्याशी लवकरच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यातून देशभरातील पोलिस दलाला ऑनलाइन तपास प्रक्रियेचे मार्गदर्शन मिळणार आहे.

महाराष्ट्र पोलिस दलाने गेल्या वर्षभरापासून आपली पोलिस ठाणी ऑनलाइन करण्यास सुरवात केलेली आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलिस ठाणे हे शंभर टक्के ऑनलाइन करण्यात आले आहे. पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीपासून ते निकाल लागेपर्यंत प्रत्येक घडामोडीची माहिती संबंधितांना ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.

क्राइम आणि क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिममध्ये महाराष्ट्रातील तीन पोलिस ठाण्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाण्याचा समावेश आहे. सातारा जिल्ह्याप्रमाणे संपूर्ण देशभरातील पोलिस ठाणी ऑनलाइन होण्यासाठी सर्व राज्यांतील पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खंडाळ्याचे पोलिस निरीक्षक सावंत यांच्याशी संवाद साधणार आहेत.

जिल्हा पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा 
खंडाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांचे जिल्ह्यातील कामकाज हे नेहमीच उजवे ठरले आहे. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबर समाजातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी समाजप्रबोधनाला प्राधान्य दिले आहे. बदलत्या युगाशी सांगड घालत ऑनलाइन तपास प्रक्रिया राबविण्यात ते अव्वल ठरले आहेत. त्यांच्या कार्यशैलीमुळे सातारा पोलिस दलाची मान उंचावली आहे.