कीर्ती शिलेदार यांना देवल पुरस्कार जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

सांगली - येथील देवल स्मारक मंदिरच्या वतीने देण्यात येणारा नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल सन्मान पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री श्रीमती कीर्ती शिलेदार यांना जाहीर झाला. लोकमान्य टिळक स्मारक मंदिरात 13 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शरद बापट यांनी दिली. 

देवल स्मारक संस्थेतर्फे 1997 पासून दरवर्षी 13 नोव्हेंबर या नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या जयंतीदिनी सन्मान पुरस्कार देण्यात येतो. 11 हजार 111 रुपये, सन्मान चिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

संगीत रंगभूमीचा पाया ज्यांनी घातला त्या गोविंद बल्लाळ देवल यांच्या नावाचा पुरस्कार मला जाहीर झाला, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या आईलाही हा पुरस्कार मिळाला होता. देवलांच्या मृच्छकटीक, शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांत मी भूमिका केल्या. संगीत शारदामध्ये मी नटी, शारदा, वल्लरी आणि इंदिराकाकू अशा चार भूमिका केल्या. नाट्याचार्य देवलांच्या नावाचा हा पुरस्कार मला मिळणार याचा खूप आनंद झाला. 
- कीर्ती शिलेदार 

पश्चिम महाराष्ट्र

रत्नागिरी - सर्वपित्रीच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या वादळी वारा व मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सर्वाधिक पाऊस संगमेश्‍...

10.12 PM

कोल्हापूर - टेंबलाईवाडी प्रभागातील सार्वजनिक शौचालयाची दारे मोडल्यामुळे महिला चौकटीला साडीचा आडोसा करुन शौचास बसतात. नगरसेवक...

08.27 PM

कऱ्हाड (सातारा): कोयना धरणा पाणलोट क्षेत्रासह तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात सरासरी...

07.42 PM