'कोल्हापुरातील गरजा ओळखून काम करू'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

कोल्हापूर - महापालिकेचे नवे आयुक्त अभिजित चौधरी कोल्हापुरात आले असून, उद्या (ता.3) ते पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. मावळते आयुक्त पी. शिवशंकर यांची परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्याने त्यांच्या जागी श्री. चौधरी यांची नियुक्ती झाली. 

अभिजित चौधरीदेखील 2011 च्या बॅचचे अधिकारी आहेत. कोल्हापूर शहराच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. त्यासाठी पहिले पंधरा-वीस दिवस कोल्हापूर समजून घेऊन इथल्या गरजा ओळखून काम सुरू करू, असे चौधरी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

श्री. चौधरी यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी म्हणून काम केले असून, आता आयुक्‍तपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. चौधरी यांनीही कामाचा ठसा उमटविला आहे. पी. शिवशंकर यांनी महापालिकेच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा चांगला वापर केला होता. तसेच, महापालिकेचे सर्व कामकाज संगणकाद्वारेच चालविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यांच्या चांगल्या योजना यापुढेही तशाच सुरू ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. 

विस्कटलेली घडी बसविण्याचे आव्हान 
आयुक्त अभिजित चौधरी यांना महापालिकेची विस्कटलेली घडी व्यवस्थित बसवावी लागणार आहे. थेट पाइपलाइन योजनेचे काम शहरात सुरू आहे; पण या कामाकडे एकाही अधिकाऱ्याचे लक्ष नाही. नगरोत्थानमधील रस्त्यांची कामे अपुरीच आहेत. अमृत योजनेतून आता ड्रेनेजसाठी 72 कोटींचा निधी आला आहे. 91 कोटींच्या महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखड्यास विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. महापालिकेची मुख्य इमारत आता अपुरी पडत आहे. पार्किंगसह अन्य समस्या येथे जाणवतात. त्यादृष्टीनेही प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

Web Title: Kolhapur to identify the needs of the work

टॅग्स