‘सिद्धिविनायक’कडून ‘जलयुक्त’साठी १ कोटी

‘सिद्धिविनायक’कडून ‘जलयुक्त’साठी १ कोटी

कोल्हापूर - जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासतर्फे १  कोटीचा धनादेश न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे सुपूर्द केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आमदार अमल महाडिक, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, न्यासाचे कोषाध्यक्ष सुमंत भार्गव घैसास, विश्‍वस्त सर्वश्री गोपाळ रघुनाथ दळवी, संजय हरिचंद्र सावंत, विशाखा शरद राऊत, पंकज यशवंत गोरे, सुबोध शरद आचार्य, वैभवी विजय चव्हाण व उपकार्यकारी अधिकारी  रवी जाधव, परिवहन सभापती राहुल चव्हाण, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव, संजय पवार, नियाज खान, प्रज्ञा उत्तुरे आदी उपस्थित होते.

करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन
मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर व ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी स्वागत केले. या वेळी विशाखा राऊत, सुमंत घैसास, गोपाळ दळवी, संजय सावंत, पंकज गोरे, सुबोध आचार्य, वैभवी चव्हाण, रवी जाधव आदी उपस्थित होते.

श्री सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या १ कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यामुळे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामास अधिक गती मिळेल, असे जिल्हाधिकारी सुभेदार यांनी स्पष्ट केले.

न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर म्हणाले, ‘‘श्री सिद्धिविनायक न्यासाकडून यापूर्वी राज्यातील ३४ जिल्ह्यांना ६७ कोटी ५० लाखांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानाच्या कामास गती मिळाली आहे. निधीमधून करण्यात आलेल्या विविध जलसंवर्धनाच्या कामांमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पाण्याची साठवणूक झाली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com