विसर्जन मिरवणुकीवर १३०० पोलिसांचा वॉच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

जिल्ह्यात ३५०० पोलिस बंदोबस्तासाठी - मनोऱ्यांतून दुर्बिणीने, कंट्रोल रूममधून सीसीटीव्हीद्वारे नजर
कोल्हापूर - पारंपरिक पद्धतीने मंगळवारी (ता. ५) होणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी जिल्ह्यात तब्बल साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. आज पोलिस मुख्यालयातील मैदानावर त्याचे वाटप झाले. शहरातील विसर्जन मिरवणुकीवर तब्बल १३०० पोलिसांची नजर असणार आहे.

शहरातील प्रमुख विसर्जन मार्गांवरील मिरवणुकीला खासबाग मैदानापासून सकाळी आठ वाजता सुरवात होईल. येथे पालकमंत्र्यांसह इतर प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. काही मंडळे आज रात्रीच ट्रॅक्‍टर ट्रॉली आणून ठेवतात. त्यामुळे रात्रीपासून मुख्य विसर्जन मार्गावरील बंदोबस्त ठेवला आहे. शहरात पोलिसांनी अधिक लक्ष्य केंद्रित केले आहे. विसर्जन मिरवणुकीवर तेराशे पोलिस नजर ठेवून राहणार आहेत.

याचबरोबर इचलकरंजी, जयसिंगपूर, पेठवडगाव, कागल, गडहिंग्लज आदी ठिकाणीही बंदोबस्त असणार आहे. पोलिस मुख्यालयातील मैदानावर आज सकाळी बंदोबस्ताचे वाटप करताना पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी संयमाने राहा. गर्दीवर आवर्जून लक्ष ठेवा. छेडछाड, खिसेकापू, मिरवणुकीत अडवणूक होईल, अशांवर नजर ठेवा. हुल्लडबाज तरुणांना वेळीच रोखा, डॉल्बी सिस्टीम वाजणार नाही, याकडे लक्ष्य द्या. अशा सूचना केल्या.

दृष्टिक्षेपात तयारी
पोलिसांचे विसर्जन मार्गावर दहा ठिकाणी मनोरे 
दहा दुर्बिणीतून मिरवणुकीवर वॉच
प्रत्येक मनोऱ्यांवर वॉकीटॉकी
मिरवणूक मार्गावर ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे 
पोलिस अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल रूममधून नियंत्रण
पोलिसांचे एक पथक कंट्रोल रूममधून मिरवणुकीवर नजर
कंट्रोल रूममधील पथक बंदोबस्तावरील पोलिसांना सूचना देणार.
पंचगंगा घाट, राजाराम बंधारा, बापट कॅम्प आणि इराणी खाणीवरही बंदोबस्त