चड्डी बनियन टोळीकडून दीड किलो साने जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

कोल्हापूर - राज्यात एकापाठोपाठ एक घरफोड्या करणाऱ्या चड्डी बनियन टोळीतील चौघांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आणखी 60 घरफोड्या उघडकीस आणण्यात यश आले. अटक केलेल्या चौघांकडून दीड किलो वजनाचे सोन्याचे आणि 127 ग्रॅम चांदीचे दागिने असा 48 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

उन्हाळी सुटीनंतर बंद घरांवर चोरट्यांनी लक्ष केंद्रित केले होते. प्राथमिक तपासानुसार, हे कृत्य चड्डी बनियन टोळीचे असल्याचे पुढे आले.

पोलिसांनी इटकूर (ता. उस्मानाबाद) येथील चड्डी बनियन टोळीतील चौघांना अटक केली. दत्तात्रय आत्माराम काळे (वय 26), रामेश्‍वर ऊर्फ पम्या छना शिंदे (39), राजेंद्र आबा काळे (32) आणि अनिल भगवान काळे (वय 45, सर्व रा. इटकूर, ता. कळंब, उस्मानाबाद) अशी त्यांची नावे आहेत. घरफोडीचे सोने टोळीने उस्मानाबाद जिल्ह्यातील सोनाराला विकल्याचेही तपासात पुढे आले आहे. त्यानुसार इटकूर कळंब येथील प्रशांत गोविंद वेदपाठक (वय 38) याला अटक केली.

चड्डी बनियन टोळीमधील चौघांकडून शहर, करवीर, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ अशा ठिकाणच्या आणखी 60 घरफोड्या उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले. त्यांच्याकडून 43 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोने दीड किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि चार लाख रुपये किमतीचे 127 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 48 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.