पंचगंगा घाट विकासासाठी ४ कोटी ७८ लाख मंजूर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

कोल्हापूर - पंचगंगा नदीघाट विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील निधी मंजूर झाला आहे. ४ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केल्याचे पत्रक भारतीय जनता पक्षातर्फे प्रसिद्धीस देण्यात 
आले आहे. 

कोल्हापूर - पंचगंगा नदीघाट विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील निधी मंजूर झाला आहे. ४ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केल्याचे पत्रक भारतीय जनता पक्षातर्फे प्रसिद्धीस देण्यात 
आले आहे. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाल्याचे ही पत्रकात म्हटले आहे.  पत्रकात म्हटले आहे, की  पंचगंगा नदीघाट संवर्धन विकास आराखड्यासंदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांनी दोन वर्षापासून आर्किटेक्‍ट श्री. नागेशकर यांच्यासोबत घाटाची रचना, विकास याबाबत बैठका झाल्या. घाटाबाबतचा रचनात्मक आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर भाजपचे तत्कालीन जिल्हा अध्यक्ष महेश जाधव, संदीप देसाई, विजय जाधव, अशोक देसाई यांनी परिसराची पाहणी केली होती. याबाबत पालकमंत्री श्री. पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करण्यात आला होता. 

जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठी मंत्री श्री. पाटील प्रयत्न करीत आहेत. त्यातूनच हा निधी मंजूर झाला आहे. पंचगंगा विकास आराखड्यासंदर्भात या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना काही सूचना, म्हणणे मांडायचे असेल तर त्यांनी लेखी स्वरूपात भाजपा जिल्हा कार्यालय बिंदू चौक येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.