कागलनजीक अपघातात सांगली जिल्ह्यातील चारजण ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

कागल - राष्ट्रीय महामार्गावर येथील लक्ष्मीटेकडीजवळ आराम बसची रस्ता ओलांडणाऱ्या मोटारीला जोराची धडक बसली. या अपघातात मोटारीमधील चार जण ठार झाले तर तिघे जण गंभीर जखमी झाले. सर्व मयत सांगली जिल्ह्यातील आहेत. हा अपघात सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघाताची नोंद कागल पोलीसांत झाली आहे. 

कागल - राष्ट्रीय महामार्गावर येथील लक्ष्मीटेकडीजवळ आराम बसची रस्ता ओलांडणाऱ्या मोटारीला जोराची धडक बसली. या अपघातात मोटारीमधील चार जण ठार झाले तर तिघे जण गंभीर जखमी झाले. सर्व मयत सांगली जिल्ह्यातील आहेत. हा अपघात सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघाताची नोंद कागल पोलीसांत झाली आहे. 

अनिल शिवाजी शिंगटे (वय 38), आकांक्षा शिवाजी शिंगटे (वय 14), आदित्य शिवाजी शिंगटे (वय11) (सर्व रा. अमरापूर, ता. कडेगाव, जि. सांगली), नितीन हिंदूराव माने (रा. करंजे, ता. खानापूर, जि. सांगली) हे चौघे जण मयत झाले तर अलका संभाजी शिंगटे (वय 35), वैशाली अनिल शिंगटे (वय 32), धनश्री संभाजी शिंगटे (वय 11) (रा. सर्व अमरापूर, जि. सांगली) हे तीघेजण गंभीर जखमी आहेत. जखमींवर कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोटारीमधील सर्वजण नातेवाईकाच्या मयतासाठी जात असल्याचे समजते. 

शिंगटे परिवार मोटारी (क्र. एमएच.09 एक्‍यु 3162) मधून कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमधून येथील लक्ष्मी टेकडीजवळ आले असता, कोल्हापूरहून बेंगलोरकडे जाणाऱ्या आराम बसची (क्र. केए23 सी 8869) त्यास जोराची धडक बसली. धडक इतकी जोरात होती की, मोटार सुमारे साठ फुट फरफटत गेली. या अपघातात अनिल शिंगटे हे जागीच ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले. मोटार चालक नितीन माने हा स्टेअरींगमध्ये अडकला होता. बाजूचा पत्रा उचकटून त्यास बाहेर काढण्यात आले. सर्वांना तातडीने कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या अपघातातील जखमी आकांक्षा शिवाजी शिंगटे, आदित्य शिवाजी शिंगटे व नितीन हिंदूराव माने हे उपचार सुरु असताना मयत झाले. आराम बसचालक नईम शौकतअली दडवाड (वय 48, रा. चिंचवाड, पो. लिंगनमठ, ता. खानापूर, जि. बेळगाव) यास कागल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातस्थळी रात्री करवीर उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव, करवीर पालिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव यांनी तात्काळ भेट दिली व जखमींना रुग्णालयात हालविले. कागल पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्रीगणेश कवितके अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: Kolhapur news accident near Kagal four dead