नोकरी स्विकारण्यापूर्वीच सुशांतवर काळाचा घाला 

नोकरी स्विकारण्यापूर्वीच सुशांतवर काळाचा घाला 

कोल्हापूर - आता सुशांत कोणती नोकरी स्वीकारणार याची घरात चर्चा सुरू होती. आनंदी आनंद वातावरण होते. त्याचवेळी सुशांत पाटील शिवजयंतीसाठी वॉलचंद कॉलेजमध्ये होता. त्याला कालच तीन कंपन्यांची ऑफर लेटर आली होती. "कॅम्पस इंटरव्ह्यू'मध्ये त्याचे सिलेक्‍शन झाले होते. मात्र आज पहाटे त्याचा अपघाती मृत्यू झाला.

सुशांतचे आई-वडील शेतकरी असून त्यांना धक्का बसू नये, म्हणून त्यांना सीपीआरमध्ये आणले नव्हते. सुशांत जखमी आहे. त्याला घेवून येतो, असे सांगून नातेवाईक आणि गावकरी सीपीआरमध्ये आले. 

सुशांत विजय पाटील (वय 18, रा. अंजनी, तासगाव, जि. सांगली) हा वॉलचंद कॉलेजमध्ये डिप्लोमा इलेक्‍ट्रीक इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षात शिकत होता. प्रचंड हुशार म्हणून त्याची कॉलेजमध्ये ख्याती होती. अभ्यासू असलेल्या सुशांत सर्वांचा लाडका होता. त्याचा मित्र परिवारही मोठा होता. नुकताच कॉलेजमध्ये कॅम्पस इंरटव्ह्यू झाला. त्यात कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून अनेक अपेक्षा ठेवल्या होत्या. त्यामुळेच त्याला तीन कंपन्यांची ऑफर लेटर आली होती. त्यापैकी कोणत्या ठिकाणी नोकरी स्वीकारायची हे तो व त्याचे कुटुंबिय मिळून ठरविणार होते. मात्र वॉलचंद कॉलेजमध्ये सलग तीन दिवस सुरू असलेल्या शिवजयंती उत्सवात सुशांत मग्न होता. त्यातूनच काल तो इतर मुलांसह पन्हाळ्याला ज्योत आणण्यासाठी आला. आज पहाटे पन्हाळ गडावरून सांगलीला जाताना नागाव फाट्यावर झालेल्या अपघातात तो ठार झाला. घरी आनंदाचे वातावरण असतानाच आज घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबियांसमोर दुःखाचा डोंगर कोसळला. हाताखाली आलेलं पोरंग आज अचानक आपल्यातून निघून गेल्याची भावाना त्यांच्या नातेवाईकांत होती. 

ज्योतीत तेल घालण्यासाठी टेम्पों थांबला अन्‌.. 
तीन दिवस कॉलेजमध्ये शिवजन्मोत्सवाचे आयोजन आमचे होते. त्यानुसार पोवाडा, स्वच्छता, मर्दानी खेळ काल झाले. रात्री पन्हाळ्याला ज्योत आणण्यासाठी निघालो. शिवाजी पुल बंद आहे, म्हणून रस्ता बदलून आलो. ज्योतीत तेल घालण्यासाठी गाडी रस्त्याकडेला थांबवली होती. पण अचानक आलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे आमचा आयशर ट्रक पलटी झाला आणि पाच जण मयत झाले. 

-  मनिष परमार, वॉलचंद कॉलेजचा विद्यार्थी

संबंधीत बातम्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com