शेतीपंपांच्‍या विजेसाठी हवेत २०८ कोटी

शेतीपंपांच्‍या विजेसाठी हवेत २०८ कोटी

विभागात १५ हजार ६०० जोडण्याची प्रतीक्षा; आमदारांनी पाठपुरावा करावा

कोल्हापूर - कृषीपंपाना जोडण्या देण्यासाठी २०८ कोटी रुपयांचा निधीची गरज आहे, असा निधी शासनाकडून उपलब्ध न झाल्याने कोल्हापूर परिमंडलातील १५ हजार ६०० शेतकऱ्यांना कृषी पंपाची थ्रीफेज विजेची प्रतीक्षा आहे. त्यासाठी आमदारांच्या पातळीवर येत्या अधिवेशनात पाठपुरावा झाला तरच हा निधी मिळू शकेल. तो पर्यंत त्यामुळे कृषीपंपाला वीज जोडणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेली झाडाझडती सोसावी लागेल, अशी स्थिती आहे.   

राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे हवालदिल होता. आता पावसाला सुरवात झाली, पण वीज जोडणीच नसल्याने शेतीला पाणीपुरवठा करायचा कसा या चिंतेने शेतकरी घेरला आहे. 

सप्टेंबरनंतर पाऊस संपला की, शेतीला पाणी देण्यासाठी कृषीपंपाना विजेची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी वीज मिटर मिळावे, यासाठी महावितरणकडे पैसे भरले आहेत, त्यांना महिन्या दोन महिन्यात मीटर येईल वीज मिळेल, असे सांगण्यातही आले होते. मात्र प्रत्यक्ष तीन वर्षे झाली, पण प्रत्यक्ष वीज मीटर आलेले नाही अशा शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.  

गतवर्षी ऊर्जा मंत्र्यांनी कृषी पंपाच्या वीज जोडण्या तत्काळ द्याव्यात, अशा सुचना अभियत्यांना केल्या होत्या त्यानुसार प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचे सर्वाधिक काम कोल्हापूर परिमंडलात झाले नंतर कृषीपंपाची मीटर पुरेशा संख्येने महावितरणकडे आलेली नसल्याने कृषीपंपाची वीज जोडण्यासाठी प्रतीक्षा यादी लांबत गेली आहे. 

अशी मीटर घेण्यासाठी महावितरणला २०८ कोटींचा निधी आवश्‍यक आहे. हा निधी मिळाला तरच प्रलंबित मीटरची संख्या कमी करता येणार आहे, मात्र तूर्त निधीच नाही अशात कृषीपंपाची मागणी वाढती आणि वीजपुरवठा नवीन जोडणी देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. 

निधी वेळेत आला, शेतकरी व महावितरणच्या पातळीवर तांत्रिक कामे पूर्ण झाली तर आक्‍टोबरपासून नवीन वीज जोडण्या तातडीने मिळाल्या तर येत्या हंगामात पिकाला पाणी देण्याचे शेतकऱ्यांना नियोजन करता येईल. त्यामुळे येत्या महिन्याभरात किमान मीटर व पूरक साहित्यासाठी निधी मिळविण्याचा प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, कोल्हापूर सांगलीतील सर्व आमदारांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केल्यास हे काम गतीने होईल. 

तीन वर्षे प्रतीक्षा  
गेल्या दोन वर्षात मराठवाड्यात दुष्काळ होता तेथील शेतकऱ्यांना प्राधान्याने पाणीपुरवठा घेता यावा यासाठी मराठवाड्यात कृषीपंपाना वीज जोडण्या देण्याला प्राधान्य देण्यात आले; तेव्हा कृषी पंपाच्या मीटरची संख्या तिकडे वाढली पश्‍चिम महाराष्ट्राचा वाटा कमी झाला त्यातून येथे कृषी वीज जोडण्याची देण्याच्या प्रलंबितांची यादी वाढली आहे. यात २०१३ पासून वीज जोडण्या देण्याचे काम थकीत आहे. 

निधीची आवश्‍यकता 
कृषीपंपासाठी थ्री फेज वीज जोडणी असावी लागते. बहुतांशी कृषीपंप शेती, विहिरीवर किंवा नदीकाठी असतात. त्यासाठी गावातून वीज पुरवठा करणाऱ्या तारा जोडत कृषींपपापर्यंत न्याव्या लागतात. त्यासाठी पोल उभारणी करावी लागते. तर गावाला पुरवठा होणाऱ्या विजेचे वर्गीकरण व दाब संतुलण करण्यासाठी रोहित्र बसवावे लागते हा खर्च प्रत्येक गावासाठी कमीत कमी ३ लाखांच्या पुढे असतो. तोच खर्च करणे महावितरणला शक्‍य नाही. त्यामुळे शासनाकडून निधी आला तरच हे काम वेगाने होऊन कृषीपंपाना वेळेत वीज मिळणे शक्‍य होणार आहे.    

प्रलंबित प्रकरणे व आवश्‍यक निधी असा
कोल्हापूर ४ हजार १७५  त्यासाठी आवश्‍यक निधी सुमारे ७ कोटी ८२ लाख 
सांगली ११ हजार ३०० त्यासाठी आवश्‍यक निधी सुमारे १४८ कोटी ९६ लाख 

गतवर्षी २०१५ -१६ प्रलंबित कृषी पंपाच्या यादी पैकी १६ हजार ३३५ नवीन जोडण्या दिल्या. 
२००१६-१७ ला यंदा १४ हजार ५९६ वीज जोडण्या दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com