कोल्हापूरच्या अंबाबाईची शैलपुत्री रुपातील पुजा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

कोल्हापूर ः नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी गुरूवारी करवीर निवासनी श्री अंबाबाईची शैलपुत्री रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्रीपुजक मयुर व मंदार मुनश्‍विर यांनी ही पुजा बांधली.

कोल्हापूर ः नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी गुरूवारी करवीर निवासनी श्री अंबाबाईची शैलपुत्री रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्रीपुजक मयुर व मंदार मुनश्‍विर यांनी ही पुजा बांधली.

शैलपुत्री म्हणजे.... 
शैलपुत्री म्हणजे शब्दशः पर्वताची कन्या. माता सतीच्या देहत्यागानंतर सृष्टीक्रमातून विरक्त झालेल्या भगवान शंकराना पुन्हा कार्यरत करण्यासाठी तसेच तारकासुराचा वध करणारा शिवपुत्र प्रगट व्हावा यासाठी शिवाच्या शक्तीने पुन्हा अवतार घेणे गरजेचे होते. म्हणून हिमालयाच्या प्रार्थनेवरुन देवीने पार्वतीचा अवतार घेतला. या रुपात ती शिवाप्रमाणे गोरी नंदीवर आरूढ व त्रिशुलधारीणी अशी प्रथमदुर्गा रूपात दर्शन देते.  

टॅग्स