अंबाबाई मंदिरात फुटाणे खडीसाखरेचा प्रसाद द्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांना खडी साखर व फुटाणे, असा प्रसाद वाटप करण्यात यावा. त्यासाठी खडीसाखर व फुटाणे कायमस्वरूपी पुरविण्यात येतील, असे निवेदन क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे देवस्थान समितीच्या अध्यक्षांना आज देण्यात आले. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात मंदिरात आलेल्या भाविकांना खडीसाखर व फुटाणे, असा प्रसादही वाटप करण्यात आला. 

या निवेदनातील माहिती अशी, की करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात परंपरेविरुद्ध पावले उचलली जात आहेत. याबद्दल भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे. परंपरा मोडीत काढण्याचा प्रकार उधळून लावून परंपरा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी भाविक पुढे येत आहेत. म्हणून अंबाबाईच्या नावे देण्यात येणाऱ्या पारंपरिक प्रसादाचे म्हणजे खडी साखर व फुटाण्याच्या वाटपाची प्रथा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी आहे. त्यासाठी खडीसाखर व फुटाणे मराठा चेंबर तर्फे समितीला पुरविले जातील, समितीने ते भाविकांना वाटप करावेत, असे निवेदनात म्हटले आहे. पुढील काळातही खडी साखर व फुटाणे पुरविण्याची तयारी असल्याचा उल्लेख या निवेदनात आहे. 

जयेश कदम व आर. के. पाटील, विजय जाधव, उमेश पोवार, नितीन सासने, सतीश कडूकर, विकास पाटील, पृथ्वीराज पाटील, विजयकुमार पाटील, प्रशांत पाटील, शिवा जाधव, संजय पाटील, बाबा आमते आदींच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर - सोलापूर परिसरातील विविध महाविद्यालयांत नटसम्राट नाटकाचे एकपात्री प्रयोग फुलचंद नागटिळक करीत आहेत. नुकताच त्यांनी...

02.21 AM

सोलापूर - राज्य व केंद्र सरकारच्या शेतीमाल भाव ठरविणाऱ्या समितीला घटनात्मक अधिकारच नाहीत, तर हमीभाव मिळणार कसा? असा प्रश्‍न...

01.30 AM

सोलापूर - जिल्हा दूध संघाला 2016-17 या आर्थिक वर्षात सात कोटी 12 लाख रुपयांचा तोटा झाला आहे. दूध व्यवसायातील मंदीबरोबरच...

01.21 AM