अरिहंत जैन फाउंडेशन देणार दोन कुटुंबांना ४ सौरकंदील देणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - ‘ज्योत से ज्योत जगाते चलो,’ या भावनेने अरिहंत जैन फाउंडेशनने मानबेट धनगरवाड्यातील दोन कुटुंबांना चार सौरकंदील देण्याचा निर्णय घेतला. जंगलाच्या हद्दीलगत राहणाऱ्या या ‘दोन कुटुंबांची दीपावली अंधारातच’ अशा आशयाचे वृत्त आज ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले.

कोल्हापूर - ‘ज्योत से ज्योत जगाते चलो,’ या भावनेने अरिहंत जैन फाउंडेशनने मानबेट धनगरवाड्यातील दोन कुटुंबांना चार सौरकंदील देण्याचा निर्णय घेतला. जंगलाच्या हद्दीलगत राहणाऱ्या या ‘दोन कुटुंबांची दीपावली अंधारातच’ अशा आशयाचे वृत्त आज ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले.

गेल्या कित्येक पिढ्या निर्मनुष्य अशा मानबेट धनगरवाड्यात ही दोन कुटुंबे राहतात. वन्यप्राणी बचाव व इतर खबरदारीचा उपाय म्हणून दिवस मावळला, की खोपटाची दारे बंद करून घेत, त्यातच अख्खी रात्र काढतात. काही बरेवाईट घडले, तर त्यांची हाक इतर कोणीही ऐकू शकणार नाही व मदतीला तातडीने कोणीही येऊच शकणार नाही असे त्यांचे जगणे आहे. 
दोन दिवस हत्तीने त्यांच्या खोपटालगत दाणादाण उडवून दिली. गवे किंवा इतर प्राण्यांचा त्रास यापूर्वी त्यांनी अनुभवला; पण काही दिवसांत हत्तीचा वावर सुरू झाला. शुक्रवारी रात्री हत्तीने खोपटासमोरच्या शेडची मोडतोड गेली. उंबराचे झाड सोंडेने उन्मळून टाकले.  घरात रॉकेल नसल्याने प्रकाशासाठी चिमणीही पेटवू शकत नाही अशी त्यांची अवस्था होती.

आकाश कंदीलही
आज या संदर्भातले वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अरिहंत जैन फाउंडेशनच्या प्रमुखांनी तातडीने सौर कंदील देण्याचा निर्णय घेतला. अमोल कोरगावकर यांनी या कुटुंबांना कपडे, फराळ पुरवून प्रथमच या कुटुंबाच्या खोपट्यावर आकाश कंदील लावण्याचा निर्णय घेतला.  ते म्हणाले, ‘‘आमची, रोजची दिवाळी आहे; पण रक्तामांसाची ही माणसे, जिल्ह्यात अंधारात जगतात ही कल्पनाच सहन न हेणारी आहे. म्हणून आम्ही दिवाळीदिवशी या धनगरवाड्यात जाऊन त्यांच्यासोबत दीपावली साजरी करणार आहोत.’’ शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांनी या कुटुंबाची अडचण एका दिवसापुरती नसल्याने कायमस्वरूपी ते चांगल्या स्थितीत राहतील यासाठी मार्ग काढून काही दिवसांत त्याची अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले.