शांतीचा संदेश देणारे - हजरत इमाम हुसैन (रजिअल्लाह)

शांतीचा संदेश देणारे - हजरत इमाम हुसैन (रजिअल्लाह)

रविवारी (ता. १) मोहरमनिमित्त शांतीचा संदेश देणारे हजरत इमाम हुसैन (रजिअल्लाह) यांच्याविषयी...

इस्लाममध्ये मुहर्रम महिना वर्षाचा पहिला महिना मानतात. मुहर्रम हा आत्मचिंतन व आत्मशुद्धी करण्याचा महिना आहे. हजरत इमाम हुसैन हे आदरणीय प्रेषित महंम्मद पैगंबर यांच्या परिवारातील असल्याने ज्ञानी व सुशिक्षित होते. आई-वडिलांप्रमाणे ते ज्ञानी सत्यनिष्ठी आणि नमाजी होते. हजरत इमाम हुसेन मोठे विचारवंत होते. अवघ्या २६ वर्षांत त्यांना ज्ञान व विचारांचा हा वारसा त्यांना आपले आजोबा प्रेषित हजरत महंम्मद पैगंबर यांच्याकडून मिळाला होता.

(अल्लाह) परमेश्‍वरने मानव जातीला शुद्धी देऊन मानवांमध्ये परमेश्‍वराचे प्रतिबिंब प्रकट केले आहे. बिघडलेल्या समाजाला चांगल्या विचारांची दिशा देण्यासाठी हजरत हमान हुसैन करबला शहरात आले होते. हजरत इमान हुसैनच्या या लढाईत सर्व वर्ण, जातीचे शेतकरी, गरीब, श्रीमंत, अज्ञानी, ज्ञानी शिक्षकही होते. त्यांच्या लढाईत ७२ सैनिक होते. इ. स. ६८० मध्ये अरबची सत्ता यजीद राजाकडे गेली. मात्र, त्याला हुसैन यांचा विरोध होता.

हजरत हमान हुसैनने आपल्या आचरणातून, पुण्यकर्म करणाऱ्यास मदत करा, असे सांगितले. जो वाईट कर्म करीत असेल तर चांगल्या कर्मासाठी प्रेरित करा. संयम हे वीरांचे सौंदर्य आहे. कंजूषीमुळे दारिद्य्र येते, खोटेपणामुळे अपमान सहन करावा लागतो, परोपकाराची भावना हा अल्लाहचा मोठा अनुग्रह आहे. दानशूरतेमुळे संपत्ती आपल्या पायाची दासी होते. जो आपल्या मानव बंधूस सहकार्य करील. अल्लाह (परमेश्‍वर) अंतिम निवाड्यांच्या दिवशी त्याला मोक्ष देईल, दानधर्मातून पुण्यकर्म करावे, असा संदेश दिला.

इस्लाममध्ये पहिला महिना हा मोहरम महिना मानला जातो. मोहरम महिन्यात हजरत इमाम हुसैन दोन तारखेला ‘नेनवा’च्या प्रदेशात सैन्यासह पोचले. करबला मैदानाच्या किनारी फुरात नदी होती. तेथे आपले तंबू घातले; परंतु यजीद राजाने नदीपासून लांब अंतरावर तंबू घालण्यास सांगितले. यजीदचा उद्देश हा होता की, हजरत इमाम हुसैनला युद्धाला प्रेरित करावयाचे; परंतु हुसैन शांतिप्रिय संयमी होते. हजरत इमाम हुसैनला फुरात नदीमधून पाणी घेण्यास विरोध केला. ७ मोहरममध्ये हजरत इमाम हुसैनच्या तंबूमधील पाणी संपले.

७ मोहरमपासून १० मोहरमपर्यंत तीन दिवस तंबूमधील लोकांचे अन्न, पाणी बंद झाले. ते तहानेने व्याकूळ झाले. यजीदने पाणी बंद केले. अशा परिस्थितीत हजरत इमाम हुसैनच्या सैन्यातील एकही सैनिक यजीदकडे गेला नाही; परंतु यजीदकडील तीन साधी यजीदला सोडून हजरत इमाम हुसैनच्या तंबूत आले. यजीद हजरत इमाम हुसैनला ठार मारणार होता. कारण हजरत इमाम हुसैन जगामध्ये सुख, शांती, स्वातंत्र्याचे राज्य देणार होता. हजरत इमाम हुसैनचे सैनिक आणि परिवारातील सदस्य शहीद झाले. मानवताची रक्षा करण्याची शिकवण यजीदला दिली तरीही यजीदने हजरत इमाम हुसैनवरती हमला केला. त्यांनी प्रतिकार केला.

यामध्ये यजीदचे सेनापती, शिपाई मारले गेले. यजीद मला ठार मारणार, या विचाराने हजरत इमाम हुसैनने प्रतिकार बंद केला. ‘‘माझ्या एकाचे रक्त सांडू दे; परंतु माझ्यासाठी सर्व मानवांचे रक्‍त सांडायला नको म्हणून मानवाची सुरक्षितता होईल’’, यजीदने त्यांचा फायदा घेतला व हजरत इमाम हुसैनवर हल्ला केला व ते जखमी झाले. हजरत इमाम हुसैनची शेवटची प्रार्थना म्हणजे नमाज ८० जखमा होऊनही सुरूच होती. तो दिवस होता शुक्रवारचा आणि तारीख १० मोहरम होती. मोहरमच्या महिन्यातील १० तारखेला हजरत हुसैन शहीद झाले; मात्र अमर झाले. हजरत इमाम हुसैन हे करबला येथे सत्यासाठी शहीद झाले. म्हणूनच त्यांना करबलाचे शहीद म्हणून ओळखले जाते. मोहरमच्या ९ व १० तारखेला (रोजा) उपवास करायचा असतो. मोहरमच्या महिन्यातील १० तारखेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरजूंना अन्नदान, कपडे दान करणे, नमाज, पुण्यकर्म करावे. 

घराणेशाही संपुष्टात आणून प्रेषितांच्या काळातील समतावादी आदर्श खिलाफत शासन प्रणाली पुन्हा जोमात सुरू करण्याचा त्यांचा उदात्त हेतू होता. त्यासाठी त्यांनी बलिदान दिले; पण हुकूमशाहीसमोर नतमस्तक झाले नाहीत. कारण जगावर हुकूम त्याचाच चालू शकतो, ज्याने जग निर्माण केले, जो जगाचा खरा मालक आहे. या तत्त्वावर प्रबळ श्रद्धा होती. खरा पालनकर्ता फक्‍त आणि फक्‍त अल्लाहाच असून माणूस हा फक्‍त त्याचा प्रतिनिधी (खलिफा) आहे. हे खिलाफत शासन प्रणालीचे तत्त्व हजरत इमाम हुसैन यांनी आपल्या हौतात्म्याद्वारे अधोरेखित केले. आज गरज आहे. ती हजरत इमाम हुसैन यांची चळवळ पुढे नेण्याची. श्रद्धा, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्यायावर आधारित व्यवस्था निर्माण करण्याची.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com