नंदवाळला वैष्णवांचा मेळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

हजारो भाविकांनी घेतले विठ्ठल-रखुमाई-सत्यभामाचे दर्शन

सडोली खालसा - विठ्ठल नामाचा घोष, टाळ-मृदूंगाचा गजर, वाऱ्याच्या लहरी बरोबर, फडकणाऱ्या भगव्या पताका, डोक्‍यांवर तुळीश वृंदावन अशा भक्‍तिमय वातावरणामध्ये हजारो वैष्णवांचा मेळा नंदवाळ (ता. करवीर) येथील विठूरायाच्या चरणी नतमस्तक झाला. 

ऊन-पावसाचा खेळ यामध्ये रमलेले भाविकांच्या आनंदाला उधाण आले. रात्री उशिरापर्यंत सुमारे चार लाख भाविकांनी उपस्थिती लावली. विठ्ठलाचे निजस्थान हे नंदवाळ ‘आधी नंदापूर मग पंढरपूर’ अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे. यामुळे आषाढी-एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक येतात.

विठ्ठल-रखुमाई-सत्यभामा अशा स्वयंभू तीन मूर्ती असणारे हेमांडपंथी एकमेव मंदिर आहे. एक किलोमीटर अंतरावर भीमाशंकर मंदिर आहे. यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरते. पहाटे अडीच वाजता जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त कार्यकारी डॉ. इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली. यावेळी विश्‍वास फाटक, शंकरराव शेळके, भीमराव पाटील, कृष्णात पाटील उपस्थित होते. यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिरामध्ये थेट दर्शन व मुखदर्शन अशा दोन रांगा करण्यात आल्या होत्या. 

थेट दर्शनासाठी दुपारपर्यंत दिड ते दोन किलोमीटर जैताळ रोडपर्यंत रांगा लागल्या होत्या. भाविकांना रांगेतून पाच तास उभे राहून दर्शन मिळत होते. यात्रा कमिटीने व प्रशासनाने भाविकांची चांगल्या प्रकारे सोय केली होती. दिवसभर मंदिरात भजन सुरू होते. 

मंदिराच्या परिसरामध्ये नारळ फोडण्यास व गावामध्ये डिजिटल लावण्यास मनाई केली होती. यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्‍य झाले. राधानगरी-कोल्हापूर रोडवरील वाशीपासून पुढे वाहनाने बंदी घातली होती. करवीरचे उपविभागीय अधिकारी सुरज गुरव याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त होता. 

करवीरच्या पश्‍चिम भागातून येणाऱ्या पायी दिंड्या व भाविकांना चहा-फराळ-पाणी यांची व्यवस्था करण्यात आली होती. लोकराजा प्रतिष्ठान कांडगावचे दत्तात्रय मेडसिंगे, जिल्हा परिषदेचे सदस्य राहूल पाटील, बाचणीतील महादेव पाटील, हळदी येथील केदार हॉटेल, शिवाजी पाटील, सुधाकर मगदूम, पंचायत समिती सदस्य राजू सूर्यवंशी आदीनी पुढाकार घेतला होता. 

दरम्यान राधानगरी-कोल्हापूर रोडवरील वाशी येथील थेटपाईप लाईनचे काम सुरू आहे. हे काम रेंगाळल्यामुळे वाहतूकीची कोंडी होत होती. तर रस्त्यावर माती पडल्याने दलदल झाली होती. यामुळे अनेक भाविक घसरून पडत होते. यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्‍त होत होती. 

अश्‍वाच्या दर्शनासाठी झुंबड
बाचणी (ता. करवीर) येथील पायी दिंडीचे आगमन वाशी येथील खत कारखान्याजवळ सकाळी साडे दहा वाजता झाले. यावेळी रिगंण सोहळा झाला. आमदार चंद्रदिप नरके यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी कुंभी-बॅंकेचे चेअरमन अजित नरके उपस्थित होते. माऊली अश्‍वाचे दर्शन घेण्यासाठी झुंबड उडाली. महिलांनी फुगडीचा फेर धरला. यानंतर फराळाचे वाटप सिद्धीविनायक मित्राने केले.