काळजवडेत युवतीसह वृद्धेवर खुनी हल्ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

कळे - पडसाळीहून कोल्हापूरकडे परतणाऱ्या एस.टी.त अल्पवयीन मुलीसह वृद्धेवर सत्तुराने खुनी हल्ला झाला. गिरजाबाई मारुती दाभोळकर (वय ६०, रा. मानवाड, ता. पन्हाळा) आणि स्नेहल प्रकाश कांबळे (वय १७, रा. पोंबरे, ता. पन्हाळा) अशी जखमींची नावे आहेत. तर शामराव तुकाराम माळवी (वय ५६, रा. पोंबरे, ता. पन्हाळा) असे हल्लेखोराचे नाव आहे. कांडरवाडी ते काळजवडेदरम्यान हा हल्ला झाला.

चालक दशरथ डवरी व वाहक संगीता कांबळे एस.टी. (एमएच २० डी ९०१६) घेऊन रंकाळा स्टॅंडकडे परतत होते. एस.टी.त मानवाडमध्ये गिरजाबाई दाभोळकर, तर पोंबरेत शामराव माळवी, स्नेहल कांबळे, तिची आई आदी प्रवासी चढले. एसटी कांडरवाडीत आली असता अचानकपणे शामराव माळवी याने सत्तुराने स्नेहल व गिरजाबाईच्या डोक्‍यात हल्ला केला.

रक्ताच्या चिळकांड्या उडू लागताच प्रवाशांनी आरडाओरड केला. काही युवकांनी माळवीच्या हातातून सत्तूर काढून घेईपर्यंत एस.टी. काळजवडेत पोहचली होती. काळजवडेत माळवीला जमावाने चांगलाच चोप दिला. चालक, वाहकांनी कळे पोलिस ठाण्याकडे गाडी नेली. तेथून जखमींना कळे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. तेथे उपचारास दिरंगाई होत असल्याच्या कारणावरून नातेवाइकांनी दंगा घातला. कळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश देसाईंनी तत्काळ भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली व जखमींना सीपीआरमध्ये हलवले.

Web Title: Kolhapur News attack on girl and old woman