गोरेंना पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

कोल्हापूर - साहित्याच्या क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा साहित्य अकादमीचा पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी आणि युवा साहित्यिक नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ कादंबरीला प्राप्त झाला. ही विद्यापीठाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्वार प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी काढले. डॉ. शिर्के यांनी त्यांना ग्रंथ भेट देऊन त्यांचे कौतुक केले.

गोरे मूळचे सांगली जिल्ह्यातील उमदी (ता. जत) येथील आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण उमदी येथे झाले. शिवाजी विद्यापीठातून मराठी विषयात एम.ए. केले. ते मराठी अधिविभागात डॉ. रणधीर शिंदे यांच्या बृहत्संशोधन 
प्रकल्पावर फेलो म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी फेसाटी कादंबरीमधून दुष्काळी प्रदेशातील पशुपालक समाजातील तरुणाचा शिक्षणविषयक जगण्याचा भोवताल चित्रित केला आहे. या कादंबरीस नवलेखक अनुदान योजनेत महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदानही मिळाले होते.

या वेळी अधिष्ठाता प्रा. डॉ. भारती पाटील, डॉ. ए. एम. गुरव, डॉ. प्रकाश राऊत, डॉ. आर. के. कामत, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. दत्ता घोलप उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News award to Navnath Gore