भैरीचा धबधबा... मृत्यूचा डोह

सुधाकर काशीद
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - राधानगरी अभयारण्यातील दाट जंगल म्हणून ज्याची ओळख आहे; जेथे अस्वल, गवे व बिबटे यांचा वावर आहे; जेथे आसपासचे स्थानिक लोक आजही जायला धजत नाहीत, अशी इथली स्थिती. अशा माऊलीच्या कुंडाकडे सहल नेण्याचे धाडस का केले? हा प्रश्‍न राधानगरी अभयारण्यातील दुर्घटनेमुळे निर्माण झाला. कुंडाजवळ असलेल्या धबधब्यात अक्षय सुरेश बुरूड (रा. नानीबाई चिखली) या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला.

ज्या माऊलीच्या कुंडाजवळ सहलीसाठी विद्यार्थी गेले होते, तेथे जाण्यासाठी पाच किलोमीटर चालावे लागते. न्यू करंजे गावाजवळ हा धबधबा आहे.

जंगल इतके दाट आहे, की सहज तेथे जाणे केवळ अशक्‍य आहे. विशेष हे की तिकडे कोणी निघाले तर स्थानिक लोक जाऊ नका, असा इशारा देतात; पण पर्यटनाच्या उत्साहात तिकडे विद्यार्थी गेल्याने ही दुर्घटना घडली. 

हा धबधबा जिथे कोसळतो तेथे तब्बल १८ ते २० फूट खोल पाण्याचा डोह आहे. प्रथमच आलेल्यांना आकर्षित करण्याची या डोहात ताकद आहे; पण पाण्याचा अंदाज नसणाऱ्यांना असे डोह म्हणजे धोक्‍याचे आहेत. तीन दिवसांपूर्वी नानीबाई चिखली येथील विद्यार्थी या ठिकाणी सहलीसाठी आले. काही अंतर सपाट पठार पार केल्यानंतर दाट जंगलाच्या वाटेने या माऊलीच्या कुंडापर्यंत आले. या ठिकाणी भैरीचे एक प्राचीन देवस्थान आहे. या कुंडाच्या परिसरात इतके दाट जंगल आहे, की अस्वलांचा, बिबट्यांचाच तेथे वावर आहे; पण कुंडाकडे न जाण्याच्या परंपरेस स्थानिक भाषेत काही अल्पीत कथांची जोड देतात. परिणामी, या कुंडाजवळचा धबधबा १२ महिने कोसळत असूनही तेथे मनुष्याचा वावर कमी असतो. 

वन विभागाचे कर्मचारी मात्र या परिसरात जाऊन वन्य प्राण्यांच्या पायाचे ठसे, विष्ठा यावरून त्यांच्या वावराचा अंदाज घेतात.

जंगलात विनापरवानगी प्रवेश करणे गुन्हा आहे. माऊलीचे कुंड हे दाट जंगलात आहे. तेथे वन्य प्राण्यांचा वावर आहे. तिकडे हे विद्यार्थी का गेले, हा प्रश्‍नच आहे. झालेली घटना दुर्दैवी आहे. पण परिसराची माहिती नसताना कोणीही जंगलात विनापरवाना जाण्याचे धाडस करू नये.
- ए. डी. पाटील, वन अधिकारी, राधानगरी

ज्या ठिकाणी धबधबा आहे, तेथे १९ फूट खोल डोह आहे. पाण्याला प्रचंड ओढ आहे. पट्टीचा पोहणाराही या डोहात पोहू शकणार नाही, अशी इथली परिस्थिती आहे. हा डोहच काय? अन्य कोठेही पाणी, दरी, डोंगर या ठिकाणी पर्यटनाचा आनंद अतिउत्साहात व बेदरकार वृत्तीने घेऊ नये.
- दिनकर कांबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर -  कर्जमाफी योजनेतील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी घेतलेल्या पीक कर्जाचीही परतफेड करावी लागणार...

10.45 AM

कोल्हापूर - शतकोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. यात जिल्ह्यात नव्याने जवळपास ४० लाख...

10.30 AM

आपण महिषासुरमर्दिनी अथवा दुर्गादेवी म्हणून पुजतो. अशा दुर्गापूजनाचे संदर्भ आपल्याला महाभारत काळापासून दिसतात. दुर्गा म्हणजेच...

10.15 AM