भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे उद्यापासून  बेमुदत ठिय्या आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

कोल्हापूर - जिल्ह्यातील भटक्‍या-विमुक्त समाजाला घरांसह प्राथमिक सुविधा मिळाव्यात, या मागणीसाठी भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे गुरूवार (ता. 25) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल. अशी माहिती पत्रकार परिषदेत परिषदेचे समन्वयक शशांक देशपांडे यांनी दिली. 

ते म्हणाले, "भटके-विमुक्त समजाच्या विविध मागण्या आहेत. त्याकडे शासन लक्ष देत नाही. याबाबत पालकमंत्र्यांच्या अनेकदा भेटी घेतल्या. तरीही मागण्या जैसे थे आहेत. 

विकास परिषदेने केलेल्या मागण्या - 

  • भटके-विमुक्त समाजाच्या वस्त्या कायम कराव्यात.
  • तेथे पंतप्रधान आवाज योजने अंतर्गत घरकूल योजना राबवावी.
  • वसंतराव नाईक महामंडळाची कर्ज प्रकरणे अनुदानीत स्वरुपाची करावीत.
  • महामंडळा अंतर्गत समाजातील तरूणांना कौशल्य विकासांतर्गत प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करावी.
  • समाजाला शिधा पत्रिका ओळखपत्र उपलब्ध करून द्याव्यात

यावेळी परिषदेचे अशोक लाखे, सुभाष साळोखे, राजू वैदु, राम साळुंखे, योगेश पाटोळे, राजू लाखे, संतोष चौगुले, विवेक भोसले, हैबत्ती लाखे आदी उपस्थित होते. 

कोडोली (ता. पन्हाळा) येथील डवरी समाजाची वसाहत वसवण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मे 2016 ला समाज कल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर केला.21 मार्च 2018 ला सहायक आयुक्ताच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यांनी 6 एप्रिल 2018 पर्यंत प्रस्तावर कार्यवाही करतो, असे आश्‍वासन दिले,परंतु आज अखेर कोणतीही कार्यवाही नाही. 

- शशांक देशपांडे

Web Title: Kolhapur News Bhatke Vrikukta Vikas Parishad agitation