ऋतुराज पाटलांना सत्ताधाऱ्यांची थेट ‘ऑफर’

युवराज पाटील
रविवार, 27 मे 2018

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून ऋतुराज पाटील यांना सत्ताधारी पक्षाने थेट ‘ऑफर’ दिल्याचे समजते. भाजपच्या सर्व्हेत ऋतुराज यांचे नाव वरच्या क्रमांकावर राहिल्याने त्यांना आपल्याकडे द्या, असा संदेश वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचे समजते. मंत्र्यांकडूनही चाचपणी झाली असून, आमच्याकडे या, असे आवाहन केल्याचेही समजते.

माजी राज्यपाल डॉ. डी. वाय पाटील यांचा नातू, संजय पाटील यांचा पुत्र आणि आमदार सतेज पाटील यांचा पुतण्या अशीच सध्या ऋतुराज यांची ओळख आहे. पाटील घराण्याचा आगामी राजकीय वारसा म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. उत्तर मतदारसंघ सेनेचा बालेकिल्ला. गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढली. त्यामुळे मतदारसंघ कुणाच्या वाट्याला, हा आता प्रश्‍न राहिलेला नाही. २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी युती झाल्यास हा मतदारसंघ कुणाला सोडायचा, याचा निर्णय होईल. तोपर्यंत सेनेचा बालेकिल्ला काबीज करण्याची तयारी भाजपने केली आहे.

प्रारंभी मधुरिमाराजे छत्रपती यांचे नाव आघाडीवर होते. गेल्या निवडणुकीत मधुरिमाराजेंसाठी तयारी भाजपने केली होती.
सध्या पाटील काँग्रेसचे आमदार आहेत. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. महापालिकेत भाजप-ताराराणी विरोधी बाकावर आहे. महापौर निवडणुकीत भाजपने माघार घेऊन ‘ताराराणी’ला संधी दिली. त्यामागेही निश्‍चित असे काही गुपित दडले असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, पाटील कुटुंबीयांनी मात्र तूर्तास कोणताही निर्णय घेतलेला नाही. यामुळे ऋतुराज शिवसेनेकडून की भाजपकडून की काँग्रेसकडून लढणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्रही नसतो, याची प्रचिती पुन्हा एकदा येण्याची शक्‍यता वाढली आहे.

Web Title: Kolhapur News Bjp offer to Ruturaj Patil