बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

कोल्हापूर - भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ द्यावी यासह विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले. यामुळे "बीएसएनएल'च्या विविध सेवांवर परिणाम झाला. 

कोल्हापूर - भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ द्यावी यासह विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले. यामुळे "बीएसएनएल'च्या विविध सेवांवर परिणाम झाला. 

याबाबत संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपासून तृतीय वेतनवाढीसंदर्भात संघटना मागणी करीत आहे. त्यासाठी संघटनेच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी "बीएसएनएल'च्या दिल्ली मुख्यालयात मागणीची निवेदने दिली तरीही वेतनवाढ लागू झालेली नाही. खासगी टेलिफोन कंपन्यांशी स्पर्धा वाढत असताना "बीएसएनएल'चा पूर्वीचा लौकिक कायम राखण्यासाठी "बीएसएनएल'चे कर्मचारी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी "बीएसएनएल'चे मोबाईल सीमकार्ड आठवडे बाजारात विकण्यापासून ब्रॉडबॅण्ड सेवा मेळावे घेण्याचे काम करीत आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांना वेतनवाढ वेळेत मिळत नसल्याने नाराजी आहे. यामुळे आंदोलनाचे पाऊल उचलण्यात आले. 

येत्या पाच वर्षांत 80 टक्के कर्मचारी निवृत्त होणार आहेत. निवृत्तीनंतर या कर्मचाऱ्यांना व्यक्तिगत खर्च पेलविणे मुश्‍कील होईल. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांना वेतनवाढ करावी, या वेतनवाढ व पेन्शनवाढीच्या मागण्या सरकारपर्यंत पोचाव्यात यासाठी सर्व विभागांतील कर्मचारी कामावर आले; पण प्रत्यक्ष कामकाजात सहभाग घेतला नाही. या आंदोलनात जिल्हा सचिव बाळकृष्ण कदम, एच. बी. मुरगी, सुरेश देसाई, विजय माने, अनिता सूत, सौ. अतिग्रे आदी सहभागी झाले.