कोल्हापूर अग्निशामक दलाकडे आता बुलेट फायर फायटर

कोल्हापूर अग्निशामक दलाकडे आता बुलेट फायर फायटर

कोल्हापूर -  अगदी छोट्या गल्लीबोळात लागलेली आग किंवा जेथे आग विझवण्यासाठी पाण्याची पाईप नेण्यास अडचण येऊ शकते, अशा ठिकाणी बुलेटवरून जाऊन आग विझवता येणारी यंत्रणा अग्निशामक दलाकडे सज्ज झाली आहे. उद्या या यंत्रणेची सुरुवात होणार होती; पण समारंभाचे नियोजन नसल्याने पुढच्या आठवड्यात ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. 

या बुलेटच्या पाठीमागे डिक्कीच्या जागी पाणी व रासायनिक फोम याची दोन सिलिंडर असून उच्च दाबाने त्याचा फवारा आगीच्या ज्वालांवर करता येतो. त्यामुळे ३५ सेकंदांत आग विझू शकते किंवा आगीची तीव्रता कमी करता येते. ही यंत्रणा बसवलेल्या चार बुलेट (वॉटर मिस्ट फायर इन्स्ट्रुमेंट बुलेट माऊंटेड) अग्निशामक दलाकडे तयार आहेत. त्याला उच्च दाबासह पाणी व फोमचे सिलिंडर ठेवण्यासाठी डिगी केली आहे. 

आगीची वर्दी आली की, अग्निशामक दलाची गाडी पाठवण्यात येणार आहे; पण ही गाडी मोठी असल्याने वाहतुकीतले अडथळे पार करण्यात अडचणी येतात. त्यामुळे आगीच्या ठिकाणी गाडी पोहोचण्याअगोदर बुलेट यंत्रणा पोहोचू शकणार आहे. सायरन, लाल रंग व वेगळी बांधणी यामुळे या बुलेटला आडव्या तिडव्या वाहनांच्या गर्दीतूनही मार्ग काढता येणार आहे. 

या बुलेटला असलेल्या दोन सिलिंडरमध्ये पाणी व फोम आहे. त्याला गुंडाळता येणारी पाईपलाईन आहे किंवा आणीबाणीच्या स्थितीत ही सिलिंडर बुलेटवरून काढून खांद्याला लटकावत आग विझवण्याचे काम सुरू करता येणार आहे. अवघा एक कर्मचारी हे काम करू शकणार आहे. या यंत्रणेत केवळ पाणीच नव्हे, तर फोम असल्याने आगीवर लवकर नियंत्रण आणणे शक्‍य आहे. केवळ एकसारखा फवारा न मारता जेथे आगीचा भडका आहे,

तेथेच बंदुकीच्या गोळीसारखा (शॉट) फवारा मारण्याचीही सोय आहे. त्यामुळे विद्युत उपकरणाला लागलेली आगही विझवणे निर्धोक होणार आहे. या यंत्रणेची चाचणी झाली असून, आणीबाणीच्या क्षणी अग्निशामक दलाच्या मोठ्या गाडीची वाट न पाहता आग विझवण्याची सुरवात बुलेटवरचा एकटा कर्मचारी करू शकणार आहे. 

ही यंत्रणा आधुनिक आहे व हाताळण्यासाठी सोपी आहे. कोल्हापूर शहरात वाहतुकीची अनेक ठिकाणी कोंडी होते. त्यात अग्निशामक दलाची गाडी अडकते. ही गाडी वेगाने नेण्याचा प्रयत्न केला जातो; पण गाडीतील पाण्याच्या मोठ्या हेलकाव्यामुळे गाडीवर नियंत्रण ठेवताना कसरत करावी लागते. या गाडीअगोदर बुलेटवरील आमचे फायरमन गर्दीतून सहज वाट काढून अगोदर पोचू शकतात व उपलब्ध आधुनिक यंत्रणेने आग विझवण्यास सुरुवात करू शकतात.’’ 
- रणजित चिले, अग्निशामक दलप्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com