कर्करोग होऊच नये, यावर संशोधन करा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - "कर्करोगावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी या क्षेत्रातील नवनव्या तंत्रज्ञानाद्वारे हा रोगच होणार नाही, असे प्रतिबंधात्मक संशोधन करावे,' असे आवाहन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 

येथील कोल्हापूर मेडिकल असोसिएशन व कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने आयोजित "कर्करोग निदान व उपचार पद्धती' या विषयावरील दोनदिवसीय कार्यशाळेचा समारोप श्री. पाटील यांच्या हस्ते आज झाला. या वेळी ते बोलत होते. हॉटेल सयाजी येथे हा कार्यक्रम झाला. 

श्री. पाटील म्हणाले, ""पूर्वी कॅन्सर म्हटले की "कॅन्सल' अशीच भावना होती. कॅन्सर झालेल्या रुग्णाबरोबरच त्याच्या कुटुंबीयावरही भीषण परिस्थिती येते; पण अलीकडे परिस्थिती बदलली आहे. या क्षेत्रात बरेच नवनवे तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रज्ञानामुळे या रोगावर नियंत्रण मिळवणे शक्‍य झाले आहे.'' 

ते म्हणाले, ""आता या उपचार करण्याची पद्धती आल्यात, आरोग्यदायी जीवनदायी योजनांतून उपचार होऊ लागले; पण आता या क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्‍टरांची जबाबदारी वाढली आहे. या डॉक्‍टरांनी यात संशोधन करून प्रतिबंधात्मक उपायाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी देश व राज्यभरातील डॉक्‍टरांना एकत्र करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा कार्यशाळांची गरज आहे. त्यातून विचारांचे आदान-प्रदान तर होईलच, पण या क्षेत्रात नव्याने आलेल्या तंत्रज्ञानाची माहिती सर्वापर्यंत पोचेल. हे नवे तंत्रज्ञान डॉक्‍टरांनीही आत्मसात करावे.'' 

श्री. पाटील म्हणाले, ""अंतिम टप्प्यातील कर्करोग झालेल्या रुग्णांसाठी "सांजवात सेवाश्रम' मधून पूर्णपणे सहकार्य केले जाईल. मी स्वतः यात लक्ष घालून त्याचा पाठपुरावा करणार आहे.' या वेळी मुंबईच्या टाटा कॅन्सर सेंटरच्या डॉ. वाणी परमार म्हणाल्या, ""अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे स्तनाचा कर्करोग बरा होऊ शकतो, त्यासाठी रुग्णांची मानसिकता महत्त्वाची आहे.'' 

कार्यक्रमाचे स्वागत कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. सूरज पवार यांनी केले. डॉ. संदीप पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. प्रवीण हेंद्रे, डॉ. रेश्‍मा पोवार, डॉ. सोपान चौगुले आदी उपस्थित होते. 

Web Title: kolhapur news cancer chandrakant patil