शेतमालाला हमीभाव हाच पर्याय  - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

कोल्हापूर - कर्जमाफीमुळे शेतकरी सुखी होणार नाही, यापूर्वीही कर्जमाफी दिली तरीही शेतकरी कर्जबाजारीच झाला, वारंवार कर्जमाफीऐवजी त्याच्या शेतमालाला हमीभाव मिळणे हाच यावरील मार्ग आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 

येथील डॉ. व्ही. टी. पाटील फाऊंडेशनच्या स्वयंनिर्भरता संकुल आणि स्वयंप्रेरिका होममेड शॉपीचे उद्‌घाटन आज श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला त्यांच्या पत्नी अंजली पाटील याही उपस्थित होत्या. 

श्री. पाटील म्हणाले,"व्यापारी हे नफ्यावर चालतात ते शेतकऱ्यांना हमीभाव देणार नाहीत. म्हणून स्वयंसिध्दासारख्या संस्थानी शेतकऱ्यांचा माल 200 रूपये जादा दराने विकत घ्यावा. मी संस्थेला कोरा चेक देता, या व्यवहारातून नफा झाला तर तो संस्थेने घ्यावा व तोटा झाला तर तो मी सहन करीन. यातून एक आदर्श राज्यासमोर जाईल आणि अशा संस्था शेतमाल खरेदीसाठी पुढे येतील.' 

प्रास्ताविकात संस्थेच्या संस्थापिक कांचनताई परूळेकर यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. संस्थेला सहकार्य करणारे प्रविण सुर्यवंशी, राहूल चिक्कोडे, शाम नोतानी, सौम्या तिरोडकर, जयश्री तिरोडकर, योजना शहा यांचा सत्कार झाला. नगरसेविका सविता भालकर, तृप्ती पुरेकर, जयश्री गायकवाड, रत्नेश शिरोळकर, चंदन पाटील उपस्थित होते.