'25 हजार शेतकऱ्यांना खतांच्या स्वरूपात मदत देणार'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

कोल्हापूर - वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपणारा असावा, असे व्रत घेवून वाढदिवस साजरा करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसानिमित्त खतांच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात शेतीपूरक शुभेच्छा मिळाल्या. या शुभेच्छा अन्नदाता बळीराजाला देण्यात येणार असून जिल्ह्यातील सुमारे 25 हजारहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. आपल्यावर दाखवलेल्या आपुलीकीबद्दल पालकमंत्री श्री. पाटील यांनी जनेतेचे आभार मानले असल्याची माहिती वाढदिवस समितीचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी दिली. 

पालकमंत्री श्री. पाटील यांनी वाढदिवस हा नेहमीच सामाजिक जाणीव जागृतीतून साजरा केला. रद्दीच्या स्वरूपात शुभेच्छा स्वीकारून विविध संस्था, व्यक्तींना मदतीचा हात दिला तर गतवर्षी रोपांच्या स्वरूपात शुभेच्छा स्वीकारल्या. कोल्हापूर शहरात पर्यावरण समतोल राखण्यासाठी पुढाकार घेतला. यंदा पालकमंत्र्यांनी बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी वाढदिवस साजरा करणार असल्याचे जाहीर केले होते. शेतकऱ्याला पीक घेताना उत्पादन खर्च येतो. हा खर्च कमी करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला तर मोठी मदत होईल. उत्पादन खर्चापैकी खतांचा खर्च मदत म्हणून देण्याचा निर्णय पालकमंत्री श्री. पाटील यांनी घेतला. वाढदिवसाला हार, तुरे, पुष्पगुच्छांपेक्षा खतांच्या स्वरूपात शेतीपूरक शुभेच्छा देण्याचे आवाहन केले. पालकमंत्री श्री. पाटील यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात खतांच्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या. सुमारे 750 टनाहून अधिक खते शुभेच्छांच्या स्वरूपात जमा झाली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय सुमारे 25 हजारहून अधिक शेतकऱ्यांना ही खते समन्वय साधून देण्यात येणार आहेत.