वारणेवरील चावरे-घुणकी दरम्यानचा बंधारा धोकादायक स्थितीत

संजय पाटील
गुरुवार, 24 मे 2018

घुणकी - चांदोली धरण ते सांगलीपर्यंत वारणा नदीवर कोल्हापूर पध्दतीचे नऊही बंधारे धोकादायक स्थितीत आहेत. सुमारे पन्नास वर्षापूर्वी हे बंधारे बांधण्यात आले आहेत. चावरे - घुणकी दरम्यानचा बंधारा कधीही कोसळू शकतो अशीच अवस्था आहे.

घुणकी - चांदोली धरण ते सांगलीपर्यंत वारणा नदीवर कोल्हापूर पध्दतीचे नऊही बंधारे धोकादायक स्थितीत आहेत. सुमारे पन्नास वर्षापूर्वी हे बंधारे बांधण्यात आले आहेत. चावरे - घुणकी दरम्यानचा बंधारा कधीही कोसळू शकतो अशीच अवस्था आहे.

वारणा नदी सांगली जिल्ह्यात कृष्णेस मिळते. या नदीवर चांदोली येथे धरण आहे. धरण ते सांगलीपर्यंतच्या या नदीवर सुमारे दहा बंधारे आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या या नदीवर शेतकऱ्यांसाठी १९६६ ला चिचोली, १९६८ ला माणगावा, १९७९ ला मांगले-सावर्डे, १९६० ला कोडोली, १९७३ ला चावरे-घुणकी, १९६८ ला तांदुळवाडी, १९७४ ला शिगाव,१९७१ ला खोची, १९७३ ला दानोळी येथे बंधारे बांधण्यात आले.

यापैकी सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यानी वारणा कारखान्याचेवतीने मांगले, कोडोली, चावरे, शिगाव येथील बंधारे बांधले आहेत. पण आता सर्वच बंधारे कमकुवत झाले आहेत. चावरे घुणकी दरम्यानचा बंधारा खिळखिळित झाला आहे. दुर्घटना घडण्यापूर्वी लोकप्रतिनीधी लक्ष देण्याची गरज आहे.

वारणेवरील हा बंधारा सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांनी १९७३ मध्ये बांधला असून हा बंधाऱ्यांचे बांधकाम आता ठिसूळ झाले आहे. काही ठिकाणी पडझड झाली आहे. पावसाळ्यात हा बंधारा वाहून जाण्याची शक्यता आहे. यासाठी या बंधाऱ्याची दुरावस्था दुर करण्याची गरज आहे.  

- शिवाजी गुरव, चावरे

 

Web Title: Kolhapur News Chavare - Ghunkee bund in Dangerous condition